महाराष्ट्र

महा-ई-सेवा, सेतू केंद्रांचे कामकाज ठप्प दाखल्याअभावी अनेकांची कामे रखडली

महा-ई-सेवा, सेतू केंद्रांचे कामकाज ठप्प

Download Aadvaith Global APP

दाखल्याअभावी अनेकांची कामे रखडली

 

कडेगाव-

 

महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांचे कामकाज चालणाऱ्या महाआयटी सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला असल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील महा-ई-सेवा केंद्रांतील संपूर्ण सेवा ठप्प झाल्या आहेत.यामुळे शालेय विद्यार्थ्यांना दाखले मिळणे अवघड झाले आहे.याबाबत जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांतुन

 दिले जाणारे प्रमाणपत्र, दाखले, कागदपत्र वेळेत मिळत नासल्यामुळे विद्यार्थ्यांचे विविध अभ्यासक्रमांचे पुढारी प्रवेश खोळंबले आहेत. वॉच

 

राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत महा-ई-सेवा आणि सेतू केंद्र चालवले जाते परंतु गेली आठ दिवस झाले या केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.महाआयटी सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला असल्याने विविध दाखले वेळेत मिळत नाहीत.सेतु चालक व कर्मचारी हे रात्री तीन वाजेपर्यंत काम करीत बसतात व दिवसा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

 

‘नुकताच मुलाचा दहावी ,बारावी निकाल लागला असून, पुढील महाविद्यालयीन प्रवेशासाठी रहिवास प्रमाणपत्रापासून ते उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आदी कागदपत्रांसाठी महा-ई-सेवा केंद्रात अर्ज केला आहे. परंतु तांत्रिक कारणामुळे सर्व्हर बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, दाखले वेळेत मिळत नाहीत,’ अशी प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली.

 

जाते. त्यातून शासकीय परवाने, जात पडताळणी दाखले- आठवडाभरापासून महाऑनलाईनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती केंद्र चालकांकडून देण्यात आली आहे.प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्रांसह सुमारे ४२ ऑनलाइन दिले जातात.प्रकारचे बहुतांश ठिकाणी इतर आर्थिक वैद्यकीय कारणास्तव लागणारे उत्पन्नाचे दाखलेही वेळेत मिळत नाहीत.

 

राज्यातील महा-ई-सेवा, तसेच सेतू केंद्रांसाठी महाआयटी अंतर्गत एकच क्लाऊड सर्व्हर आहे. या क्लाऊड सर्व्हरमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा संचयित झाला आहे. परिणामी, क्लाऊडमध्ये जागा (स्पेस) उपलब्ध नसल्याने जुना संचयित डेटा काढण्यात येत आहे.असे सेतु चालकांकडुन सांगण्यात येत आहे. याबाबत आता जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App