महाराष्ट्र

वागंभाकरीची भक्तीमय न्याहरी, वारकऱ्याची सेवा हाच तृप्तीचा श्रीहरी

वागंभाकरीची भक्तीमय न्याहरी, वारकऱ्याची सेवा हाच तृप्तीचा श्रीहरी

Download Aadvaith Global APP

 

सदानंद माळी कडेगाव                

 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख ! पाहीन श्री मुख आवडीने !अशी ओढ मनी धरुन श्री विठ्ठल भेटीस आतूर झालेल्या वैष्णवांच्या वारीची मांदियाळी पंढरपूरकडे निघाली आहे आषाढी एकादशीला पंढरपूरला जावून विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ अनेकांना असते जे वारकरी मनोभावे विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी वारी करतात त्यांची सेवा करुन कणभर पुण्य आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काही विठ्ठलभक्त भक्तीमय अन्नदान करत असतात सांगली जिल्ह्यातील तडसरचे विठ्ठलभक्त प्रदिप पवार (खंडू काका) व सहकारी स्नेही मित्राच्या सहकार्याने दरवर्षी शिगणापूर फाटा (नातेपुते)येथे वारकऱ्यांना स्नेह भोजनाच आस्वाद देत असतात तडसर येथील भक्ती सेवा संस्था व सूरजदादा मित्रमंडळाचे व पवार कुटुंबीयाच्या वतीने यांचे आयोजन केले जाते मंडळाचे सर्व कार्यकर्ते हे तडसर येथील पवार भावकी व अन्य समाजातील सर्व घरामध्ये भाकरीचे पीठ नेवून देतात अन् गावातील सर्व महिला उस्फुर्त पणाने, उत्साहात भाकऱ्या करुन देतात त्यांनी पीठ दिल असलं तरीही स्वतः जवळचही पीठ घालून भाकरी जास्तीत जास्त करुन देतात महिला विठ्ठलमय भक्तीत तल्लीन होवून भाकऱ्या करत असतात

 आम्हाला जरी वारी जाता आलं नाही तरी आमच्या हातची भाकरी वारीतील वारकरी खावून तृप्तीचा ढेकर देत स्वतः चा आत्मा शांत करतात यातच आम्हांला विठ्ठल भेटतो हाच खरा वारकऱ्यांच्या सेवेचा मनस्वी आनंद आम्हांला मिळत असतो अक्षरशः तयार भाकऱ्या भक्ती सेवा संस्था व सूरज दादा मंडळाचे कार्यकर्ते एकत्रीत गोळा करत असतात थप्प्यावर थप्प्या भाकरी रचत असतात सात हजार भाकऱ्या, तेल वागं, खरडा, पाण्याची बाटली हे सर्व स्नेह भोजन एकञ केले जाते गेली दोन वर्ष करोनामुळे आम्हाला वारकऱ्यांची सेवा करता आली नाही दोन वर्षे सेवेपासून वंचित राहावे लागले अशी खंत प्रदिप पवार उर्फ खंडूकाका यांनी व्यक्त केली वारकऱ्यांची सेवा म्हणजे माझ्यासाठी दिवाळी, दसरा…!यंदा वारकऱ्यांची स्नेह भोजनाची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याने तो एकप्रकारे विठ्ठल मय आनंदी सोहळाच म्हणावा लागेल स्नेह भोजनात वागं, लोणचे, भाकरी ,खरडा, पाण्याची बाटली असा अनोखा न्याहरीचा बेत दिला जातो वागं ,भाकरी,खरडा खाताना वारकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही हे सर्व खाल्याशिवाय वारकऱ्याला वारीला आल्यासारखं वाटत नाही शिगणापूर फाटा (नातेपुते) येथे हा वारकऱ्यासाठीच वागं भाकरीची भक्तीमय न्याहरी, वारकऱ्यांची सेवा हाच तृप्तीचा श्रीहरी पाहूनच तडसर येथील भक्ती सेवा संस्थेचे व सूरज दादा मित्रमंडळ सर्व कार्यकर्ते,अशोक कदम, मानस मिंलिद दातार,मंगेश पाटगावकर, अर्जुन गिडडे, सूरज पवार, सागर पवार , राजकुमार जमखंडीकर,पुंडलिक बच्छाव पोलीस पाटील संजय माळी सह सर्व अन्य कार्यकर्ते व सहकार्य करणाऱ्या तडसर येथील महिला यांनी केलेल्या अन्नदानाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही अन वारीत त्यांना पंढरीच्या विठूरायाचे दर्शन झाल्यावाचून राहणार नाही असा हा अनोखा न्याहरीचा अभूतपूर्व सोहळा शेवटी हे सर्वजण म्हणतात की संसार आलीया। एक सुख आहे। आठवावे रुप। विठ्ठलाचे…..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App