राजकीय

हर घर तिरंगा अभियानात प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे: संग्रामभाऊ देशमुख.कडेगाव येथे हर घर तिरंगा जनजागृती तिरंगा रॅली

हर घर तिरंगा अभियानात प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे: संग्रामभाऊ देशमुख.कडेगाव येथे हर घर तिरंगा जनजागृती तिरंगा रॅली

Download Aadvaith Global APP

 

 

 

कडेगांव:प्रतिनिधि.

 

         भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार हर घर तिरंगा हे एतिहासिक अभियान राबविण्यात येत आहे.या देशप्रेमी अभियानामध्ये प्रत्येक नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हान सांगली जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष संग्राम(भाऊ)देशमुख यांनी केले. ते कडेगाव येथे हर घर तिरंगा जनजागृती तिरंगा रॅली मध्ये बोलत होते. यावेळी कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख,दत्तूशेठ सुर्यवंशी, प्रकाश गडळे, बाबसो शिंदे, मुख्याधिकारी कापिल जगताप,शांता कंनुजे, प्रमुख उपस्थित होते.

         यावेळी बोलताना पुढे देशमुख म्हणाले देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासापासून चालू पिढीला प्रेरणा मिळावी,स्वतंत्र सैनिकांनी दिलेल्या योगदानाची जाणीव नागरिकांच्या मनामध्ये राहावी, यासाठी “हर घर तिरंगा” ही मोहीम अत्यंत उपयुक्त आहे.जगातील सर्वात मोठे हे अभियान ठरेल असे गौरवद्वार यावेळी देशमुख यांनी काढले हर घर तिरंगा अभियान हे पंतपक्ष,धर्मविरहित असून देशाप्रती राष्ट्रभावना जागृत करणे ही आहे. स्वतंत्र चळवळीत सहभाग घेनारी पिढी आता काळाच्या पडद्याआड चालली आहे. त्यामुळे नव्या पिढीला स्वातंत्र लढ्याच्या इतिहासाचे स्मरण करून देणे हा उदांत हेतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या संकल्पनेमध्ये आहे असे देशमुख यांनी सांगितले.

       या रॅलीमध्ये संग्राम(भाऊ)देशमुख यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी हातामध्ये तिरंगा घेऊन “हर घर तिरंगा”, ‘वंदे मातरम’,”भारत माता की जय”. अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.या रॅलीमध्ये प्रचंड जनसमुदाय देशभक्तीपर कर्तव्य म्हणुन मोठ्या उत्साहाने सहभागी होते.

       यावेळी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक,सभापती, कडेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App