राजकीय

७५ वर्षांतील काँग्रेस विचार देशातील तळगळातील लोकांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी आझादी गौरव यात्रेचे आयोजन :आ.डॉ.विश्वजीत कदम

७५ वर्षांतील काँग्रेस विचार देशातील तळगळातील लोकांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी आझादी गौरव यात्रेचे आयोजन :आ.डॉ.विश्वजीत कदम

Download Aadvaith Global APP

कडेगाव : प्रतिनिधी
७५ वर्षांतील काँग्रेस विचार देशातील तळगळातील लोकांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी आझादी गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
असंघटित स्वातंत्र्य लढ्याला संघटित करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या काँग्रेस पक्षाने १९४७ पासून देश अखंडित ठेवण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी केले.


देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष्याकडून आयोजित “आझादी गौरव पदयात्रेस” संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम कदम, भारती बँकेचे संचालक डॉ.जितेश कदम, युवा नेते दिग्विजय कदम, युवक काँग्रेसचे इंद्रजीत साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ.डॉ.कदम म्हणाले, काँग्रेस पक्षाची सुरुवातच देशाच्या स्वातंत्र लढ्यातून झाली आहे. स्वातंत्र लढ्यात काँग्रेसचे योगदान हे खूप मोठे आहे. काँग्रेस पक्षानेच देशातील प्रत्येक जाती, धर्म व प्रांतांना एकसंघ ठेवण्याचे काम केले आहे. देशाच्या स्वातंत्र लढ्यातील महत्वाचा दिवस म्हणून आजच्या दिवसाचे महत्त्व आहे. त्यादृष्टीने ७५ वर्षांतील काँग्रेस विचार देशातील तळगळातील लोकांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी आझादी गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील म्हणाले, भाजपाच्या या काळात देश अधोगती व हुकूमशाहीकडे चालला आहे. काँग्रेस नसती तर आजही देश इंग्रजांच्या गुलामगिरीत अडकला असता, स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्रवीर हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमास जेष्ठ नेते बाळासाहेब कोडग, सेवा दलाचे अजित ढोले, जि.प.माजी अध्यक्षा मालनताई मोहिते, एन.एस.यू.आयचे अध्यक्ष सौरभ पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सचिन जाधव, माजी सभापती विठ्ठल मुळीक, युवा नेते हर्षवर्धन कदम, सुरेश मुळीक, सेवा दलाच्या नयना शिंदे, , तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सुनिल जगदाळे, विजय मोहिते यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार आनंदराव मोरे यांनी मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App