महाराष्ट्र

झणझणीत पिठलं भाकरीची भक्तीमय न्याहरी, वारकऱ्याची सेवा हाच तृप्तीचा श्रीहरी

झणझणीत पिठलं भाकरीची भक्तीमय न्याहरी, वारकऱ्याची सेवा हाच तृप्तीचा श्रीहरी

Download Aadvaith Global APP

 

कडेगाव . तुका म्हणे माझे हेची सर्व सुख ! पाहीन श्री मुख आवडीने ! अशी ओढ मनी धरुन श्री विठ्ठल भेटीस आतूर झालेल्या वैष्णवांच्या वारीची मांदियाळी पंढरपूरकडे निघाली आहे आषाढी एकादशीला पंढरपूरला जावून विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ अनेकांना असते जे वारकरी मनोभावे विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी वारी करतात त्यांची सेवा करून कणभर पुण्य आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काही विठ्ठलभक्त भक्तीमय अन्नदान करत असतात.

 

सांगली जिल्ह्यातील तडसरचे विठ्ठलभक्त प्रदिप पवार (खंडू काका) व सहकारी स्नेही मित्राच्या

सहकार्याने फाटा (नातेपुते) येथे वारकऱ्याना नुकताच स्नेह भोजनाच आस्वाद दिला तडसर येथील भक्ती सेवा संस्था व सूरजदादा मित्रमंडळाचे व पवार कुटुंबीयाच्या वतीने यांचे आयोजन केले जाते मंडळाचे सर्व कार्यकर्ते हे तडसर येथील पवार भावकी व अन्य समाजातील

 

सर्व घरामध्ये भाकरीचे पीठ नेवून देतात अन् गावातील सर्व महिला उस्फुर्तपणाने, उत्साहात भाकऱ्या करुन देतात त्यांनी पीठ दिल असलं तरीही स्वतः जवळचही पीठ घालून भाकरी जास्तीत जास्त करुन देतात महिला विठ्ठलमय भक्तीत तल्लीन होवून भाकऱ्या करत असतात आम्हाला जरी वारी

 

जाता आलं नाही तरी आमच्या हातची भाकरी वारीतील वारकरी खावून तृप्तीचा ढेकर देत स्वतः चा आत्मा शांत करतात यातच आम्हांला विठ्ठल भेटतो हाच खरा वारकऱ्यांच्या सेवेचा मनस्वी आनंद आम्हांला मिळत असतो. अक्षरशः तयार भाकऱ्या भक्ती सेवा संस्था व सूरज दादा मंडळाचे कार्यकर्ते एकत्रीत गोळा करत असतात थप्प्यावर थप्या भाकरी रचत असतात दहा हजार भाकऱ्या, झणझणीत पिठंल, खरडा, पाण्याची बाटली हे सर्व स्नेह भोजनाचे वाटप करण्यात आले आहे प्रदिप पवार उर्फ खंडूकाका या बाबत भावना व्यक्त करताना म्हणाले की वारकऱ्यांची सेवा म्हणजे माझ्यासाठी दिवाळी, दसरा! वारकऱ्यांची स्नेह भोजनाची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याने तो एकप्रकारे विठ्ठल मय आनंदी सोहळाच म्हणावा लागेल स्नेह भोजनात झणझणीत पिठंल, लोणचे, भाकरी, खर्डा, पाण्याची बाटली असा अनोख्या न्याहरीच्या बेताचा आस्वाद घेत होते झणझणीत पिठंल, भाकरी, खरडयाचा आस्वाद घेत असताना वारकऱ्याच्या डोळ्यांतील पाण्याबरोबरच तृप्तीचा भक्तीमय श्रीहरी भेटल्याचाच आनंद वारकऱ्याच्या चेहऱ्यावरुन ओसाडून वाहताना दिसत होता अखेर झणझणीत पिठंल भाकरीची भक्तीमय न्याहरी, वारकऱ्याची सेवा हाच तृप्तीचा श्रीहरी वारकऱ्याला सुखद आस्वाद देवून गेला याचे आयोजन भक्ती सेवा मंडळ व सूरज दादा मित्रमंडळाचेसर्व कार्यकर्ते, अशोक कदम, मानस मिलिंद दातार,अर्जून गिडडे, मंगेश पाटगांवकर,उपसंरपच सूरज पवार, सागर पवार ,राजकुमार जमखंडीकर, पुंडलिक बच्छाव सह अन्य कार्यकर्ते व सहकार्य करण्याऱ्या तडसर येथील महिला यांनी केलेल्या शारिरीक श्रमाचे चीज अन्नदानाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App