दबंग कामगीरीने कडेगाव पोलीस ठाणे झाले ‘शहाने’
दबंग कामगीरीने कडेगाव पोलीस ठाणे झाले ‘शहाने’
कडेगाव : लोकभावना न्युज
नुतन पोलिस अधिकारी यांच्या दबंग कामगीरीने आता कडेगाव पोलीस ठाणे ‘शहाने’ झाले आहे.एक महिन्यात कडेगाव पोलीसांणी वाळु तस्कर,मटका ,जुगार , मोटर चोरी सह अवैद्य धंदेवाल्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत परंतु त्यांच्या समोर अजुनही मोठी आव्हाने आ वासुन उभी ठाकली आहेत.
कडेगांव पोलीस ठाण्याचे माजी पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या बदली नंतर जितेंद्र शहाणे हे पोलीस निरीक्षक म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत.या पोलीस ठाणे अंतर्गत नेवरी आणि शाळगाव असे दोन आऊट पोस्ट आहेत. मगील एक दोन वर्षात पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हेगारीच आलेख चढ उतार राहिला आहे. यामध्ये मारामारी ,जमिनीचा वाद ,चोरी , खून, बेकायदा गौण खनिज वाहतूक विक्री गुन्हासह खाजगी सावकारी,रोडरोमीयो आदी गुन्हांचा समावेश आहे. तसेच कडेगांव शहरासह परिसरात चोरून सुरू असलेला मटका , जुगारसह,तीन पत्ती अवैध धंदे देखील वाढत आहेत. दरम्यान हे अवैध धंदे मोडून काढण्याचे व कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान शहाणे यांच्या सामोरे ठाकले आहे.
नूतन पोलीस निरीक्षक म्हणून जितेंद्र शहाणे यांची नियुक्ती झाल्यानंतर अवैध वाळू तस्करी वरुन कान्हरवाडी येथे झालेल्या खुनाने तालुका हादरुन गेला होता.याचा सखोल तपास करुन आरोपींना अटक करण्यात यश आले परंतु वाळु तस्करी मोडुन काढण्याचे आवाहन त्यांच्यासमोर होते त्यांनी अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन डंपरसह २० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. विहिरीतील मोटर व केबल चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आनले दारु व जुगार प्रकरणी १२ जनांवर गुन्हे दाखल केले आहेत.त्यांची हि दबंग कारवाई कायम रहाणे आवश्यक असल्याचे मत नागरीक व्यक्त करत आहेत.
शहरासह परिसरातील स्थानिक गुंडांची मक्तेदारी,रोड रोमीयो,खाजगी सावकारी मुळासह उपटून काढणे गरजेचे आहे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे.पोलीस मित्र योजना, जेष्ठ नागरिक,शालेय विद्यार्थी,यांना कायद्याची माहिती व नियम पोलिसांनी विविध शिबीराच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे तरच नागरीक पोलीस मित्र होतील.याची दक्षता पोलीस निरीक्षक शहाणे यांना घ्यावी लागणार आहे.वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती कारवाई करणार याकडे तालुक्यातील लोकांच्या नजरा लागल्या आहेत.
महसुल व पोलिसांच्यात वाद…
तालुक्यात येरळा व नांदनी नद्या वाळू तस्करीचे मोठे रॅकेट आहे. रात्र अपरात्री शहरासह तालुक्यात अवैध वाळू तस्करांची व वाळू वाहतुकीची वाहने रोडवर असतात परंतु महसूल गस्ती पथक हे डोळ्यांवर पट्टी बांधून पहाणी करते चार दिवसांपूर्वी कडेगाव पोलीसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर कडेगाव येथे पकडले यात महसुलच्या वरीष्ठ अधिकारी यांनी फोन वरून सदर वाहन महसुलच्या ताब्यात देण्याची सुचना केली परंतु पोलिसांनी वाहन ताब्यात देण्यास विरोध केला यामुळे काही काळ वाद झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.