ताज्या घडामोडी

आयुक्त सुनील पवार यांच्या आई सौ. सुमन मोहनराव पवार यांना राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार जाहीर

आयुक्त सुनील पवार यांच्या आई सौ. सुमन मोहनराव पवार यांना
राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार जाहीर

Download Aadvaith Global APP

कडेगांव : प्रतिनिधी
तडसर ( ता.कडेगाव ) येथील सौ. सुमन मोहनराव पवार यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर झाला आहे.
सौ. सुमन मोहनराव पवार. सौ सुमन यांचा जन्म विसापूर गावी, तालुका तासगाव येथे दिनांक 11.4.1950 रोजी झाला. त्यांचे माहेरचे नाव सुमन रामचंद्र चव्हाण, या माऊलीचे आई हौसाबाई तर वडील रामचंद्र पांडुरंग चव्हाण हे सरकारी नोकरीत तलाठी या पदावर कार्यरत होते, तर आई गृहिणी होती. वडिलांचे शिक्षण इयत्ता सातवी पर्यंत झाले होते. माहेरची परिस्थिती चांगली होती. हे सर्व मिळून सहा भावंडे होते. त्यामध्ये चौथा नंबर असलेल्या सुमन यांचे शिक्षण सहावी पर्यतच झाले त्यांच्या आई दम्याच्या आजाराने त्रस्त होत्या. आईची सेवा करता करता व घरातील इतर कामांची जबाबदारी यामुळे त्यांना सहावीपर्यतच शिक्षण घेता आले व शाळा मध्येच सोडावी लागली. वडील तलाठी असल्यामुळे ते तडसर या गावी बरीच वर्षे नोकरी करीत होते. त्यावेळी त्यांचे मोठे नाव होते व ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांना आपली मुलगी तडसर मध्ये द्यावी असे मनोमन वाटत होते. गावचे राहणीमान व घोषा पद्धत त्यांना आवडली होती. अशातच गावातील मोहिते कुटुंबातील व्यक्तींनी पुढाकार घेऊन तडसर या गावचे स्थळ आणले. वडिलांना खूप आनंद झाला व त्यांचा विवाह श्री बापूसाहेब कृष्णाजी पवार (इनामदार) यांचे चिरंजीव श्री मोहन बापूसाहेब पवार यांच्याशी झाला. अशा रीतीने त्यांची तडसर मध्ये आपल्या मुलीच्या विवाहाची इच्छा पूर्ण झाली.

पती श्री मोहन यांचा जन्म तडसर या गावी दिनांक 10.4.1945 रोजी झाला. श्री मोहन यांचे शिक्षण इंटर आर्ट्स पर्यंत झाले पैकी पहिली ते अकरावी पर्यंतचे शिक्षण तडसर या गावी झाले. पुढील उच्च शिक्षण कराड येथे झाले. शिक्षण संपल्यानंतर ते स्यत शिक्षण संस्था सातारा, या शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात क्लार्क या पदावर कार्यरत होते त्यांचे प्रमोशन होऊन ते हेड क्लार्क म्हणून दिनांक 28.2.2003 रोजी सेवानिवृत्त झाले सध्या ते शेती व्यवसाय सांभाळतात तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्यामध्येही मदत करतात. पती मोहनरावांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी नोकरीमध्ये असताना मुलांच्या शिक्षणाला स्थैर्यता यावी म्हणून नोकरीमध्ये मिळणारे प्रमोशन नाकारत गेले व सावळज या गावी त्यांनी एकाच ठिकाणी 25 वर्षे नोकरी केली. तुटपुंज्या पगारात घर खर्च भागवणारी माऊली सौ सुमन यांचे कुटुंबावरती असणारे प्रेम व कुटुंबाचे पालन पोषण तर दुसरीकडे पती श्री मोहन यांना नोकरीत मिळणारे प्रमोशनचा त्याग, यामुळे मुलांच्या शिक्षणाला एक आकार प्राप्त झाला व मुले उच्च विद्या
[1/19, 13:18] Farmer: विभूषित झाली. त्यांना एकूण तीन मुले झाली दोन मुले व एक मुलगी पैकी एक नंबरचा मुलगा श्री सुनील मोहन पवार यांनी राहुरी येथे एम. एस्सी (ॲग्री) पदवी घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन “मुख्याधिकारी” पदावर नियुक्ती 1997 साली झाली. नंतर बढती होऊन ते सध्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत “आयुक्त” या पदावर कार्यरत आहेत. श्री सुनील यांच्या पत्नी सौ सुषमा या सुद्धा उच्च विद्या विभूषित आहेत. ते सध्या भारती विद्यापीठ सांगली येथे एलएलबी चे शिक्षण घेतात. श्री सुनील यांना एक मुलगा व एक मुलगी असून मुलगा बीएससी (ॲग्री) ची पदवी संपादन करून एलएलबी च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. आणि मुलगी जॉर्जिया येथे एमबीबीएस दुसऱ्या वर्षात शिकत आहे. सौ सुमन यांचा दुसरा मुलगा श्री अविनाश उर्फ युवराज यांचे शिक्षण बीए पर्यत झाले असून त्यांचा सौंदर्यप्रसाधने (कॉस्मेटिक) चा मोठा व्यवसाय आहे. त्यांना दोन मुले आहेत. मुले जेव्हा लहान होती तेव्हा माऊली सौ सुमन या मुले सांभाळण्यासाठी चिरंजीव युवराज यांच्याकडे राहायला गेल्या होत्या. सौ सुमन यांची मुलगी माधवी तीचे लग्न होऊन त्या बस्तवडे गावी, तालुका तासगाव येथे सुखाने संसार करीत आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए डी. फार्म झाले असून सासरचे नाव सौ माधवी भरत सावंत आहे, दोघेजण मेडिकल व्यवसायामध्ये अग्रेसर आहेत त्यांचे मेडिकलचे दोन दुकाने आहेत श्री भरत गोविंद सावंत हे सांगली जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांचे कुटुंब सुखी व समाधानी आहे.

माऊली सौ सुमन यांचे सासरे श्री बापूसाहेब कृष्णा पवार व सासू सौ मानकाबाई बापूसो पवार दोघांचा स्वभाव त्यांच्या आई-वडिलांसारखा प्रेमळ होता स्वावलंबी होता सासू-सासरे जरी शेती व्यवसाय करीत होते तरी घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यांचे विचार शिक्षण पुरस्कृत होते. त्यांनी नेहमीच शिक्षणाला प्राधान्य दिले. सध्या ते दोघेही हयात नाहीत, पण त्यांचाच आदर्श श्री मोहन व सौ. सुमन यांनी आपल्या मुलांपुढे ठेवला. तुटपुंज्या पगारात मुलांना शिक्षणामध्ये काहीही अडचण येऊ दिली नाही. व मुलांना घडविले. मुलांनी सुद्धा आई-वडिलांचे कष्ट पाहून मोठ्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करून आई-वडिलांचे कष्टाचे चीज केले. विशेष म्हणजे त्यांना देवपूजेची खूप आवड आहे व त्या देवपूजा करताना एखाद्या देवाचं भजन कायम गुणगुणत असतात आणि त्यांचा छंद म्हणत असाल तर रेडिओ ची गाणी ऐकून वहीमध्ये लिहून काढणे व त्याचा संग्रह करून ठेवणे हा होय.

अजून एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते की, माऊली सौ सुमन यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत वाईट काळ म्हणजे त्यांचे आजारी पडणे हे होते जणू हसते खेळते व शिक्षणाने ओतप्रोत भरलेल्या कुटुंबावर नियतीने जणू घाला घातला, त्या आजाराचे निदान काही केल्या लागेना सगळे कुटुंब हवालदिल झाले होते. त्या मिरज येथे दवाखान्यात दीड ते दोन महिने ऍडमिट होत्या, शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. त्या दुखण्यातून पूर्णपणे बच्या झाल्या आणि आपल्या कुटुंबात परत आल्या हे पाहून सर्व कुटुंब आनंदित झाले.

माऊली सौ. सुमन यांची मुलांकडून छोटी अपेक्षा आहे की, मुलांनी कधीही कुणाला त्रास न देता स्वावलंबी जीवन जगावे व आपापल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिक राहून कष्टाची भाजी भाकरी सुखाने व समाधानाने खावी.

 

राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी या संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार वितरण रविवार दि. २१ जानेवारी २०२४ रोजी
विठ्ठल पाटील पालिटेक्निक, इनाम धामणी, सांगली येथे होणार आहे.

 

 

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App