ताज्या घडामोडी

सुपर बझारला कडेगावसह सर्वाची पसंती:नगरसेविका सौ.विद्या खाडे

सुपर बझारला कडेगावसह सर्वाची पसंती:नगरसेविका सौ.विद्या खाडे
कडेगांव: प्रतिनिधी
कडेगावातील सुपर बझार हा अल्पावधीतच कडेगावसह सर्वाच्या पसंतीला उतरला आहे असे मत नगरसेविका सौ.विद्या खाडे यांनी व्यक्त केले.
कडेगांव येथील सुपर बझारने महिलासाठी हळदीकुंकू समारंभ व दिवाळी बंपर धमाका सोडत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ मनिषा रजपूत या होत्या. प्रारंभी युवा उद्योजक कृष्णात माळी यांनी सर्व उपस्थिताचे स्वागत केले .प्रास्ताविकात माळी म्हणाले की कडेगाव नगरपंचायतीच्या स्वच्छता करणाऱ्या कामगार म्हणजेच स्वच्छतादूताना दिवाळी साहित्याच्या कीटची भेट दिली तर बंपर धमाका सोडतीतील विजेत्याना बक्षीसाबरोबरही एक वृक्ष भेट देण्यात आला. आम्ही नेहमी सुपर बझार माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आलो आहोत . दिवाळी बंपर सोडतीचा समारंभात बक्षीस वितरण नगरसेविका सौ.विद्या खाडे,सौ मनिषा रजपूत व सलीम इनामदार ,युवा उद्योजक कृष्णात माळीसह मान्यवराच्या हस्ते करण्यात आले . हळदीकुंकू समारंभाचे आयोजक सौ पूजा माळी, सौ सविता माळी,सौ ज्योती माळी, सौ.सुजाता माळी यांनी महिलाना हळदीकुंकू लावत औक्षण केले. या कार्यक्रमाचे आयोजन संग्राम माळी,ओंकार माळी, सुपर बझारचे सर्व कर्मचारी यांनी केले तर आभार दिग्विजय माळी यांनी मानले

Download Aadvaith Global APP
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App