ताज्या घडामोडी

गुहागर- विजापूर महामार्गाची अपुर्ण कामे मार्गी लावणार : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निहाल कळेकर 

गुहागर- विजापूर महामार्गाची अपुर्ण कामे मार्गी लावणार : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निहाल कळेकर 

Download Aadvaith Global APP

 

 

कडेगाव : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील 84 गतिरोधक यापूर्वी काढलेले असून उर्वरित 350 ते 400 पांढरे गतिरोधक 15 जानेवारीपर्यंत काढले जातील.तसेच महामार्गाची जी काही कामे अपूर्ण आहेत,किंवा ज्या काही सुधारणा करावयाच्या आहेत त्या तात्काळ पूर्ण केल्या जातील.अशी माहिती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निहाल कळेकर यांनी दिली.

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपुर्ण व रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत.येवलेवाडीतील टोलनाका सुरू करू नये.तसेच कऱ्हाड ते अमरापूर पर्यंत असलेले जाचक गतिरोधक काढावेत व तेथे कमी उंचीचे गतिरोधक बसवावेत आदी मागण्यासाठी आज कडेगाव बसस्थानक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस व कडेगाव पाणी संघर्ष समिती यांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.यावेळी ते बोलत होते.

डी.एस.देशमुख म्हणाले,महामार्गावरील जादा उंचीच्या जाचक गतिरोधकाची उंची कमी करावी.सुर्ली घाटात महामार्ग चारपदरी करावा,महामार्गाच्या दुतर्फा तोडलेली झाडे नियमानुसार पुन्हा लावावीत,कडेगाव शहरातील अपुर्ण नाल्याची कामे पूर्ण करावित,येवलेवाडी येथील टोल नाका सुरु करु नये. 

यावेळी डी.एस. देशमुख,जगदीश महाडिक,सोमनाथ पवार बजरंग आडसुळ,नामदेव रास्कर, विशाल जाधव किरण कुराडे,अभिमन्यू वरुडे,दीपक न्यायनीत, आप्पा यादव,आसिफ इनामदार,महामार्ग अभियंता गणेश कापरे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

…………………..

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App