ताज्या घडामोडी

ज्वलंत समस्या , प्रश्नांवर भिडणारे साहित्यिक सध्या दिसत नाहीत : साहित्यिक चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली खंत

ज्वलंत समस्या , प्रश्नांवर भिडणारे साहित्यिक सध्या दिसत नाहीत : साहित्यिक चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली खंत

Download Aadvaith Global APP

कडेगाव/प्रतिनिधी

 

आजच्या ज्वलंत समस्या व प्रश्न भयाण असून त्याला भिडणारे साहित्यिक दिसत नाहीत अशी खंत साहित्यिक पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली कडेगाव येथील अंधकवी चंद्रकांत देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते,कवी संमेलनाचे अध्यक्षस्थानी अभिजीत पाटील होते .         

  सहस्त्रबुद्धे पुढे बोलताना म्हणाले की मीडिया व माध्यमाच स्वरुप बदलत चालले आहे यात साहित्यिकाच्या लेखनला कितपत जागा मिळते हा आज खरा प्रश्न आहे समाजातील आजच्या समस्या जाणून त्यावर साहित्यिकांनी व कवींनी लेखन करणे गरजेचे आहे ज्वलंत समस्यावर लेखकानी निर्भीडपणे लिहीत ताकदीच्या साहित्यकृती निर्माण केल्या पाहिजेत समाजाला प्रेरणा देणारी साहित्य निर्मिती केली पाहिजे लेखकानी समाजातील विचारांचा जागर करत विचारांची ताकद समाजापर्यंत पोहोचवण्याची आज आवश्यकता आहे यासाठी लेखकानी विचारांचा जागर करणारे लेखन करून समाजाला जागृती करण्याचे काम करावे.

     प्रारंभी प्रास्ताविक अँड . सुभाष पाटील प्रमुख पाहुण्यांचा परिचय रघुराज मिटकरी यांनी करून दिला नगराध्यक्ष धनंजय देशमुख सुरेश थोरात ( निर्मळ) राजाराम गरुड आणि सौ देशमुखे यांनी मनोगत व्यक्त केली उपनगराध्यक्ष विजय गायकवाड महेश कराडकर शांतिनाथ मांगले लता ऐवळे ,सागर सुर्यवशी उपस्थित होते सूत्रसंचालन मन्सूर जमादार व आभार प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी मांनले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App