ताज्या घडामोडी

नुकसानग्रस्त कुटुंबांना योग्य ती मदत करावी आमदार डॉ विश्वजित कदम : वादळी पावसाने मोठे नुकसान

 

 

नुकसानग्रस्त कुटुंबांना योग्य ती मदत करावी

आमदार डॉ विश्वजित कदम : वादळी पावसाने मोठे नुकसान

कडेगांव : 

वादळी पाऊस व वाऱ्याने संजय पालकर यांचे शेड चे पत्रे उडून गेल्याने प्रचंड प्रमाणात मोठे नुकसान झाले आहे.येथे राहणाऱ्या मजुर कुटुंबांना सर्वोतपरी मदत करू.तसेच येथे राहणाऱ्या सदर मजूर कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत व योग्य ती मदत करण्याबाबत कडेगांव तहसीलदार व नगरपंचायतीचे मुख्यधिकर्याना आमदार डॉ विश्वजित कदम यांनी सूचना केली.

    कडेगाव येथील संजय पालकर यांचे गोडाऊन शेड कालच्या वादळी पाऊस व वाऱ्याने शेड उडून गेले.या ठिकाणाची पाहणी आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी भेट देवून केली.यावेळी ते बोलत होते.

    यावेळी बोलताना डॉ कदम म्हणाले, वादळी पावसामुळे कडेगांव शहराला व परिसराला काही प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र याचा सर्वाधिक फटका पालकर यांच्या शेडमध्ये राहणाऱ्या 25ते 27 मजूर कुटुंबानं बसला आहे.या कुटुंबानं योग्य ती मदत केली जाईल असे ते म्हणाले.

    यावेळी कडेगावचे तहसीलदार अजित शेलार , नगरपंचायतचे मुख्याधिकारी कपिल जगताप , ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, विजय शिदे, विजय गायकवाड, सागर सूर्यवंशी, संजय पालकर, दादासो माळी, सिद्दिक पठाण, महेश जाधव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App