मजुरांना तातडीने जीवनावश्यक वस्तूंची मदत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश : तहसीलदार अजित शेलार
मजुरांना तातडीने जीवनावश्यक वस्तूंची मदत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश : तहसीलदार अजित शेलार
कडेगाव प्रतिनिधी :
कडेगांव अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यामुळे सुमारे 45 मजूरांचे छत्र हरपले तसेच 13 मजुर जखमी झाले आहेत याची तात्काळ दखल घेत तहसीलदार अजित शेलार यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा केला असून उद्या सकाळी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश मंडळ अधिकारी यांना देण्यात आले आहेत. जखमी मजुरांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व मजुरांना धान्याचे वाटप महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कडेगाव येथील भाड्याच्या शेडमध्ये मजुर राहत होते अवकाळी पाऊस व सोबत वादळ आल्याने हे शेड उडून गेले
कडेगाव तालुक्यात दुपारी 3 वाजता विजांच्या कडकडासह मुसळधार स्वरुपाच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तासभर हजेरी लावली.परंतु वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे कडेगांव येथे मजुरांचे शेड उडाल्याने 13 मजुर जखमी झाले असून सुमारे 35 लाखाचे नुकसान झाले आहे.
तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मजुरानी केली आहे
.तर रात्री विजेचा लपंडाव सुरु असल्याने बाजारात व्यापारी व नागरिकांच्या त्रासात भर पडली होती यात तहसीलदार अजित शेलार यांनी तातडीने विज सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.