ताज्या घडामोडी

डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचा ३१७५ रुपये प्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचा ३१७५ रुपये प्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

Download Aadvaith Global APP

कडेगाव- प्रतिनिधी डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसास प्र.मे. टन रुपये ३१७५/- प्रमाणे १-१२-२०२३ ते १५-१२-२०२३ अखेर १ लाख १६ हजार मे.टन ऊसाचे ३६ कोटी ८३ लाख रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्याचबरोबर १-११-२०२३ ते ३०-११-२०२३ अखेर कारखान्यास गाळपास आलेल्या १ लाख ७८ हजार मे.टन उसाचे प्र.मे.टन रुपये ३१०० प्रमाणे ५५ कोटी २१ लाख रुपये यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत,उर्वरित ७५ रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येथील अशी माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार वनश्री मोहनराव कदम (दादा) यांनी दिली. यावेळी बोलताना माजी आमदार मोहनराव कदम (दादा)म्हणाले की कारखान्याने आजअखेर ४ लाख ५ हजार ९६० मे.टन ऊसाचे गाळप करून ३ लाख ५६ हजार १७० साखर पोत्यांचे उत्पन्न घेतले आहे.तसेच कारखान्याचे उपपदार्थ प्रकल्प को-जनरेशन व डिस्टीलरी पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कारखान्याने उत्तम प्रगती केली आहे.तरी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी आपले कारखान्यास पाठवावा.याप्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ व कार्यकारी संचालक मा.श्री.एस.एफ.कदम उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App