कडेगाव-पलुसच्या प्रांताधिकारीपदी विजय देशमुख आज होणार रूजू
कडेगाव-पलुसच्या प्रांताधिकारीपदी विजय देशमुख आज होणार रूजू
कडेगाव : कडेगाव- पलुस उपविभागीय अधिकारीपदी विजय देशमुख यांची आज नियुक्ती झाली आहे.तालुक्यातील येरळा नदीतील अवैध वाळू तस्करी रोखण्यासह महसुल विभागाची प्रतिमा उंचावणे अशी त्यांच्यासमोर आव्हाने आहेत.
विजय देशमुख यांनी सन 2017-18 मध्ये तेरा महिने कडेगाव येथे प्रांताधिकारी म्हणून तर सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ठरित्या कामकाज केले आहे तर सध्या ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते.त्यानंतर आता त्यांची येथे प्रांताधिकारी म्हणून बदली झाली आहे.
कडेगाव-पलूस तालुक्यात सुरू असलेली वाळू, मुरूम,माती,दगड तस्करी रोखणे तसेच तालुक्यातील महसूल विभागाची ढासळलेली प्रतिमा उंचावणे हे मोठे आव्हान आहे.
दोन्ही तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल तसेच शासकीय नियमानुसार सर्व कामे केली जातील असे प्रांताधिकारी विजय देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
……………….