ताज्या घडामोडी

तंबाखूमुक्त शाळेसाठी व्यापक जनजागृती करा                                    – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

तंबाखूमुक्त शाळेसाठी व्यापक जनजागृती करा

Download Aadvaith Global APP

                                   – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

 

 सांगली : जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात, यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. शाळा, कॉलेजजवळ तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांविरूध्द कारवाईमध्ये सातत्य ठेवावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आज दिल्या.

 राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समिती समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर ताह्मणकर, सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे, जिल्हा सल्लागार डॉ. मुजाहिद आलासकर आदि उपस्थित होते.

 निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या, तंबाखूच्या दुष्परिणामबाबत शाळा, कॉलेज स्तरावर व्यापक जनजागृती करावी. शालेय परिसरात व सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करावी. कोटपा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता तालुकास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची स्थापना सर्व तालुक्यामध्ये करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी बैठकीत दिल्या.

 तंबाखू मुक्तीसाठी समुपदेशन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तंबाखू सेवनाचे व्यसन सोडण्यासाठी 1800112356 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधवा, असे बैठकीत सांगण्यात आले.

 दरम्यान, राष्ट्रीय वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या सभेत कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App