ताज्या घडामोडी

डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची पूर्ण एफ.आर.पी.शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग 

डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची पूर्ण एफ.आर.पी.शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग 

Download Aadvaith Global APP

 कडेगांवप्रतिनिधी

 डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने पूर्ण एफ.आर.पी.शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली.यावेळी कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलताना कारखान्याचे चेअरमन मा.आ. वनश्री मोहनराव कदम दादा म्हणाले कि सन २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या ऊसाचे अंतिम बील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे.याअगोदर शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी ३०६० रु प्रति मे.टन पहिले अॅडव्हान्स अदा केले आहे.तसेच यावर्षी १२.९६%साखर उतारा निशित्त झाला असून त्याप्रमाणे उर्वरित ऊस बील १०९ रु प्रति मे.टन प्रमाणे ९ कोटी ९० लाख ९४ हजार ५९३ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. यावर्षीच्या एफ.आर.पी प्रमाणे एकूण प्रति मे.टन ३१६९ रु इतका उच्चांकी दर दिला आहे.कारखान्याने गतवर्षीप्रमाणे यावर्षीही उच्चतम ऊस दराची परंपरा कायम राखली आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कारखान्याने उत्तम प्रगती केली आहे.तरी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी आपले कारखान्यास पाठवावा.चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास उच्चांकी दर देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन,सर्व संचालक, कार्यकारी संचालक उपस्थित होत्ते. फोटो.मोहनराव कदम लावा

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App