महाराष्ट्रराजकीय

मराठा व ओ.बी.सी.संघटनामध्ये जातीयवादी वाद पेटवण्याचा डाव सरकारचा:माजी मंत्री आ.डॉ.विश्वजीत कदम

मराठा व ओ.बी.सी.संघटनामध्ये जातीयवादी वाद पेटवण्याचा डाव सरकारचा:माजी मंत्री आ.डॉ.विश्वजीत कदम

Download Aadvaith Global APP

 

कडेगाव : प्रतिनिधी

 

देशात भाजपा सरकारने हुकूमशाहीचे वातावरण निर्माण केले असून लोकशाही धोक्यात आणली जात असल्याचा घणाघात राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी केला.

शाळगाव(ता.कडेगाव) येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसंवाद पदयात्रेस संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्ह्याचे युवक नेते डॉ.जितेश कदम, दिग्विजय कदम, सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव, आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ.डॉ.कदम म्हणाले, सन २०१४ साली देशात सत्तेत येताना, भाजपाने जनतेला खोटी स्वप्ने दाखवली व सत्ता मिळवली परंतु सत्तेत आल्यानंतर देशातील जनतेचा त्यांना विसर पडला आहे, लोकशाहीच्या देशात भाजपा कडून हुकूमशाही पध्दतीने वागत आहे, आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याकडे एकतर दुर्लक्ष करायचे नाहीतर, सत्तेचा वापर करून लाठीचार्ज किंवा गोळीबार करायचा असे अनेक प्रकार आपण पाहत आहोत, पंजाबचे शेतकरी तब्बल ९ महिने रस्त्यावर बसले, त्यांच्या दिल्ली येथील आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला, मणिपूर च्या घटनेनंतर देशात माता-भगिनी सुरक्षित नसल्याचे दिसून आले, देशात माता-भगिनींचे रक्षण होत नसेल तर ती भारतमातेची आत्महत्याच असल्याचा घणाघात त्यांनी केला. वारकऱ्यांच्या वर सुद्धा या देशात लाठीचार्ज होत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे. जालना येथे शांततेत सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनावर सुद्धा लाठीचार्ज व गोळीबार करण्यात आला, संविधांत्मक पध्दतीने करण्यात येणारे प्रत्येक आंदोलन बळाच्या व सत्तेच्या जोरावर मोडून काढण्याचे काम भाजपा करत आहे. तसेच विरोधी आमदार-खासदार यांचे आवाज दाबण्यात येत आहेत, महागाई, रोजगार, महिला संरक्षण, मराठाआरक्षण, धनगर आरक्षण यासह अश्या सगळ्या बाबींवर हे शासन अपयशी असून केवळ सत्ता हा एकच कार्यक्रम यांच्याकडून सुरू असून गेल्या ९ वर्षात लोकशाही पध्दतीने निवडून आलेली ९ राज्यातील सरकारे पाडण्याचे पाप यांनी केल्याचे ते म्हणाले, आरक्षणाच्या मुद्दा वर मराठा व ओ.बी.सी.संघटनामध्ये जातीयवादी वाद पेटवण्याचा डाव यांच्याकडून सुरू आहे, देशात असे वातावरण सुरू असताना राहुल गांधी नावाचा युवक साडे तीन हजार किलोमीटर चालला असून संविधांत्मक पध्दतीने आपल्या साठी लढत आहे व हा युवक येणाऱ्या काळात निश्चितच देशातील वातावरण बदलेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, युवक नेते डॉ.जितेश कदम, बाळकृष्ण यादव, सुनिल जगदाळे, संभाजी मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी युवक नेते हर्षवर्धन कदम, कडेगावचे नगरसेवक सागर सकटे, युवक नेते विजय भोसले, हिंगणगाव चे सरपंच महेश कदम, सोनहीरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले, विजय नांगरे, युवक नेते विनायक पवार, तडसरचे सूरज पवार, सेवा दलाच्या नयना शिंदे, शोभा मोहिते, सुवर्णा पाटील, वांगीच्या सरपंच वंदना सूर्यवंशी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App