महाराष्ट्र

मतदार यादी मध्ये आपले नाव ८ डिसेंबर पर्यंत समाविष्ट करा : निवडणूक ना.तहसिलदार सागर कुलकर्णी

मतदार यादी मध्ये आपले नाव ८ डिसेंबर पर्यंत समाविष्ट करा :
निवडणूक ना.तहसिलदार सागर कुलकर्णी
कडेगाव/ प्रतिनिधी
तालुक्यातील एकूण १४१ मतदार यादी भागांची प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी सर्व ग्रामपंचायत ठिकाणी प्रसिद्ध केल्या आहेत. सदर मतदार यादी मध्ये आपले नाव समाविष्ट नसल्यास किंवा नाव किंवा फोटो दुरुस्ती असल्यास तसेच आपले नाव वगळावयाचे असल्यास आपण ८ डिसेंबर पर्यंत
करावे असे आवाहन निवडणूक ना.तहसिलदार सागर कुलकर्णी यांनी केले आहे.

Download Aadvaith Global APP

कुलकर्णी म्हणाले की आपल्या यादी भागाशी संबंधित BLO यांचे कडे जावून नमुना फोर्म नंबर ६ द्वारे मतदार नोंदणी, नमुना 7 द्वारे नाव वगळणी, नमुना ८ द्वारे तपशीलात दुरुस्ती करू शकता. तसेच ज्या नव युवा युवतींचे वय आजरोजी १७ वर्षे पूर्ण झाले आहे अशा नव युवांना देखील मतदार नोंदणी अर्ज नमुना 6 भरता येईल. याबाबत विशेष शिबिरे खालीलप्रमाणे आहेत.

विशेष मोहिम / शिबिरे SSR २०२३
१ )महिला व दिव्यांग मतदार नोंदणी १२ व १३ नोव्हे २०२२ वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५
२)नव युवक व इतर सर्व मतदार करीता १९ व २० नोव्हे २०२२ वेळ सकाळी १० ते सायकांळी ५
३)तृतीय पंथी व वेश्या व्यवसाय मधील महिला व वंचित घटक २६ व २७ नोव्हे २०२२ वेळ
सकाळी १० ते ०५
४)नव युवक व इतर सर्व मतदार करीता ३ व ४ नोव्हेंबर डिंसे २०२२वेळ सकाळी१० ते सायकाळी ५

 

दिनांक ०९/११/२०२२ ते ०८/१२/२०२२ दरम्यान BLO यांचे मार्फत किंवा online NVSP पोर्टल, Voter helpline app द्वारे नोंदणी, वगळणी, दुरुस्ती, बदली करू शकता. आता वर्षातून 4 वेळा मतदार नोंदणी ( मतदार यादी प्रसिद्ध ) होणार आहे. 1 जानेवारी, 1 एप्रिल 1 जुलै, 1 ऑक्टोबर

1) चालू मतदार यादी ही ०१.०१.२०२३ करीता ची प्रारूप यादी आहे. 2) आज रोजी ज्यांचा जन्म ०१ / १० / २००५ रोजी किंवा त्यापूर्वी झालेला आहे. ते मतदार फोर्म नंबर ६ भरू शकतील. मात्र त्याचे नाव चालू ०१.०१.२०२३ चे मतदार यादीत न येता ०१.१०.२०२३ च्या मतदार यादीत येईल. थोडक्यात १ वर्ष आधी केवळ अर्ज भरता येईल..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App