राजकीय

पलूस येथे उद्या ‘पृथ्वी – संग्राम’ युथ फौंडेशनची दहीहंडी, सिनेअभिनेत्री व राजकीय मान्यवरांची उपस्थिती

पलूस येथे उद्या ‘पृथ्वी – संग्राम’
युथ फौंडेशनची दहीहंडी,

Download Aadvaith Global APP

सिनेअभिनेत्री व राजकीय मान्यवरांची उपस्थिती.

 

कडेगाव: प्रतिनिधी
पलूस येथील पृथ्वी-संग्राम युथ फौंडेशनच्या वतीने गुरुवार (दि.२५) सायं. ६ वा. माजी खा. निलेश राणे,आ.शहाजीबापू पाटील,अभिनेत्री मानसी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पलुस येथील बाजार मैदानावर दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करणार असल्याची माहीती सांगली जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पै.रोहित पाटील यांनी दिली.


रोहित पाटील पुढे म्हणाले की पृथ्वी-संग्राम युथ फौंडेशनची माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, जि.प.माजी अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यांपूर्वी स्थापना केली.या फौंडेशनतर्फे इथून पुढील काळात युवकांचे तालुक्यातील प्रत्येक गावात मोठे संघटन उभे करून त्याद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.या दहीहंडी उत्सवासाठी राज्यातील नामांकित संघ येणार आहेत. राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रातील युवकाचे आयडॉल माजी खासदार निलेश राणे व सांगोला विधानसभा सदस्य आ.शहाजीबापू पाटील उपस्थित राहणार आहेत.
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईक हे प्रमुख आकर्षण असणार आहे, याशिवाय मुंबई येथील प्रसिद्ध कलाकारांचा नृत्याविष्कार ही सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमास सर्व युवकांनी युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोहित पाटील यांनी केले आहे. यावेळी पलुस तालुका भाजपा अध्यक्ष विजय पाटील, फाउंडेशनचे उपाध्यक्ष उद्योजक स्वानंद पाटील, रोहित पाटील, दिपक पाटील, सर्जेराव नलवडे, सूर्यकांत बुचडे, महेश
जाधव, सुरज माने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App