कडेगाव उपविभागीय कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नागरीकांशी संवाद, लोकाभिमुख धोरण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी एक कुटुंब म्हणून काम करावे: जिल्हाधिकारी अशोक काकडे

कडेगाव उपविभागीय कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नागरीकांशी संवाद,
लोकाभिमुख धोरण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी एक कुटुंब म्हणून काम करावे: जिल्हाधिकारी अशोक काकडे
कडेगाव : प्रतिनिधी
कडेगाव उपविभागीय कार्यालयास
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन नागरीकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कडेगांव महसुल विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार अजित शेलार, नायब तहसीलदार महेश अनारसे,ना.तहसिलदार वैष्णवी पुजारी आदींसह महसुल विभागाचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काकडे यांनी कार्यालयत कामानिमित्त आलेल्या नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या कामाचा निपटारा करण्याच्या सुचना दिल्या विविध संघटनेची निवेदने स्वीकारली
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की महसूल खाते शासनाचा चेहरा म्हणून ओळखले जाते. लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागापर्यंत दौरे करावे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा आणि ती प्राधान्याने निर्गत करावी.शासकीय कार्यालयाच्या कार्यपद्धतीची व नियमांची नागरिकांना माहिती नसते त्यामुळे त्यांची विविध प्रकरणे शासकीय कार्यालयात प्रलंबित राहतात. शासनाच्या १०० दिवसांच्या महत्वाकांक्षी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून कालबद्ध मोहिमेद्वारे अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी. त्यामुळे जनतेमध्ये सकारात्मक संदेश जाईल आणि थकीत महसुलाची वसुली होईल. महसूल यंत्रणेच्या माध्यमातून शासन जनतेपर्यंत पोहोचते. शासनाचे लोकाभिमुख धोरण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी एक कुटुंबाच्या भूमिकेतून समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले
यावेळी उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले व तहसीलदार अजित शेलार यांनी कार्यक्षेत्रात राबविण्यात आलेल्या महसूल विभागाच्या विविध योजनांच्या कार्यपूर्तीची आणि साध्य केलेल्या उद्दिष्टांची माहिती यावेळी दिली.
सुचना व तात्काळ अंमलबजावणी
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोमवार व शुक्रवार दोन दिवस जनतेच्या विविध प्रश्नांसाठी राखीव ठेवण्याच्या सुचना दिल्या त्यानुसार उपविभागीय व तहसीलदार कार्यालयात तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली त्यावेळी तात्काळ अंमलबजावणीची चर्चा नागरीकांच्यात होती.

नागरीकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी अशोक काकडे सोबत उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार अजित शेलार,