पलुस कडेगाव विधानसभा इतिहास !
पलुस कडेगाव विधानसभा इतिहास!
कडेगाव : संपादक प्रविण पवार
कडेगाव महाराष्ट्रच्या स्थापनेनंतर सन १९७८च्या निवडणूकीपुर्वी भिलवडी वांगी हा विधानसभा मतदार संध अस्तित्वात आला. खानापूर व तासगांव तालुक्यातील काही गांवे मिळून हा विधानसभा मतदार संघ निर्माण झाला होता.२००९साला नंतर या मतदार संघाची पुनर्रचना होवून पलूस कडेगाव मतदार संघ निर्माण झाला. यात आंधळी,मोराळे, बांबवडे गांवचा समावेश करण्यात आला. आतापर्यत या मतदारसंघात ९सार्वत्रिक विधानसभा निवडणूका पार पडल्या .तर २पोटनिवडणूका झाल्या आहेत ९सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस७वेळा तर२वेळा अपक्षानी विजय प्राप्त केला सन १९७८ते२०१९ अखेर झालेल्या निवडणूकीत एकूण २५अपक्षानी निवडणूक लढवली होती यात अपक्ष म्हणून १९८५साली डॉ पतंगराव कदम यांनी निवडणूक लढवली होती.यावेळी अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते तर अपक्ष म्हणून १९९५ साली संपतराव देशमुख यांनी निवडणूक लढवली होती यावेळी संपतराव देशमुख हेअपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. या मतदार संघाचा असा इतिहास रचला आहे.७वेळा काँग्रेसने विजय संपादन केल्याने हा मतदारसंघ काँग्रेस चाच बालेकिल्ला म्हणून ओळखला जावू लागला. हा मतदारसंघ१९७८ मध्ये अस्तित्वात आला असून १९७८ते१९८०पर्यत काँग्रेसचे वर्चस्व मतदार संघात होते १९८०च्या निवडणूकीत विद्यमान आमदार संपतराव चव्हाण यांना काँग्रेस तिकीट दिले तर काँग्रेसचे डॉ पतंगराव कदम यांना तिकिट पक्षाने नाकारले यावेळी डॉ पतंगराव कदम यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण दुदैव आड आले अन केवळ डाँ पतंगराव कदम याचा केवळ८६मतानी पराभव झाला. सन१९८५च्यासार्वत्रिक निवडणूकीत ही काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार संपतराव चव्हाण यांनाच उमेदवारी दिली तर डाँ पतंगराव कदम यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही. म्हणून डाँ पतंगराव कदम यांनी बडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली अन या निवडणूकीत अपक्ष म्हणून विजय प्राप्त केला. सन१९९०साली काँग्रेस पक्षातून डाँ पतंगराव कदमानी निवडणूक लढवून विजय प्राप्त केला.सन१९९५ च्या निवडणूकीत काँग्रेसच्या बालेकिल्ला भेदण्यास विरोधकाना यश आले यावेळी संपतराव देशमुख हे अपक्ष आमदार म्हणून विजय प्राप्त करुन निवडून आले. परंतु अल्पावधीतच अपक्ष आमदार संपतराव देशमुख यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत पृथ्वीराज देशमुख हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा वर्चस्व स्थापन करीत बालेकिल्ला आज अखेर शाबूत ठेवला आहे.१९९९,२००४,२०१४च्या निवडणूकीत डॉ पतंगराव कदम यांनी विजय प्राप्त करुन हॅटट्रिक पुर्ण करतच विजयी झाले आहेत.परंतु डाँ कदम याचे अकाली निधन झाल्याने पोटनिवडणूक झाली यात त्याचे पुत्र डॉ विश्वजीत कदम हे बिनविरोध निवडून आले. यानंतर सन२०१९च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत डाँ विश्वजीत कदम यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांना यावेळी उंच्चाकी मतदान झाले. यात त्यांना एकूण १लाख७१हजार४९७मते पडली होती. म्हणजेच एकूण झालेल्या मतापैकी ८३.४%मतदान डाँ विश्वजीत कदमाना मिळाली होती. तर नोटा म्हणजे नकारार्थी मतदान हे दोन नंबरला झाले असून नोटाचे मतदान२०६३१ म्हणजेच९.९%इतके झाले आहे. शिवसेनेच्या संजय विभुते यांना८९७६म्हणजेच४.३५%मते मिळाली आहेत यंदाच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत डाँ विश्वजीत कदम हे मागील निवडणूकीतील८३.४%या मताधिक्य मिळवणार का? या निवडणूकीत भाजप पक्षातून संग्राम देशमुख हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत .संग्राम देशमूखाना पक्षीय पाठबळ असल्याने डाँ कदम यांचे मताधिक्यात निश्चितच घट होणार की नेमकी काय जादू होणार आहे. यंदाच्या निवडणूकीत भाजपपक्ष व तुल्यबळ उमेदवार यामुळे नक्की या मतदारसंघात नेमके काय होईल.पलूस कडेगाव हया मतदार संघाची ओळख म्हणजे धक्कादायक निकाल देणारा मतदार संघ अशीच आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत नेमके धक्कातंत्राचा नेमका कोणास बसेल हा येणारा काळच ठरवेल! हे निवडणूक निकालानंतरच समजेल. दिवगंत माजी मंत्री डाँ पतंगराव कदम यांनी सलग२००४,२००९,२०१४च्या पलूस कडेगाव व पुर्वीच्या भिलवडी वांगी मतदार संघातून१लाखा पेक्षा जास्त मतदान घेवून हॅटट्रिक पूर्ण करीत विजय संपादन केला आहे.तर त्याचेच पुत्र डाँ विश्वजीत कदम यांनी पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघातून २०१९च्या निवडणूकीत १लाखापेक्षा अधिक मते मिळवून विजय प्राप्त केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पलूस कडेगाव मतदार संघातील पिता पुत्रानी१लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजयी झाल्याचे एकमेव उदाहरण आहे. असाही विक्रमी उंच्चाक पिता पुत्रानी महाराष्ट्राच्या विधानसभेत केला आहे.
चौकट…
पलूस कडेगाव विधानसभा निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे उमेदवार, पक्ष, मिळालेली मते
सन२०१९ डाँ विश्वजीत कदम- काँग्रेस-१,७१,४९७विजयी , विरुद्ध नोटा नकारार्थी मते २०६३१
सन २०१४ डाँ पतंगराव कदम -काँग्रेस१,१२,५२३ विजयी विरुद्ध पृथ्वीराज देशमुख८८४८९
सन २००९ डाँ पतंगराव कदम -काँग्रेस १,०६,२११विजयी विरुद्ध पृथ्वीराज देशमुख -अपक्ष७०६२३
सन२००४ डाँ पतंगराव कदम-काँग्रेस१,२१,९४१विजयी विरुद्ध संपतराव चव्हाण-स्वतंत्र २२०४१
सन१९९९ डाँ पतंगराव कदम काँग्रेस७९४६६ विजयी , विरुद्ध पृथ्वीराज देशमुख राष्टवादी काँग्रेस६१६३७ सन१९९५ संपतराव देशमुख- अपक्ष७१,२९६ विजयी विरुद्ध डाँ पतंगराव कदम६४०३१
सन१९९० डाँ पतंगराव कदम -काँग्रेस६४६६५ विजयी विरुद्ध क्रांतीअग्रणी जी डी लाड -शेकाप४९७३८
सन१९८५ डाँ पतंगराव कदम-अपक्ष ६३८६५विजयी विरुद्ध संपतराव चव्हाण -काँग्रेस३३७००
सन१९८० संपतराव चव्हाण -काँग्रेस३३४७६ विजयी विरुद्ध डाँ पतंगराव कदम ३३३९० सन१९७८ संपतराव चव्हाण-काँग्रेस४३४१९ विजयी विरुद्ध क्रांती अग्रणी जी .डी .लाड- शेकाप २१०९७