पलुस कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादी आमदार अरुण लाड यांनी बोलावली अती तातडीची बैठक

पलुस कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादी
आमदार अरुण लाड यांनी बोलावली अती तातडीची बैठक
कडेगाव: निवडणूक विशेष
पलुस कडेगाव विधानसभा मतदारसंघ संघात महाविकास आघाडी उमेदवार आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी काल सोमवार आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते यावरुन कदम यांनी आमदार अरुण लाड यांच्या बाबत कोणाच्या आदेशाची वाट पाहता आम्ही कधी आदेशाची वाट पाहिली नाही पदवीधर ला मदत केली असे म्हणतात पुढे काय? असे जाहीर भाषण केले.हे भाषण चांगलेच व्हायरस झाले आहे. यावरुन आज मंगळवार आ.लाड यांनी प्रमुख कार्यकर्ते बैठक बोलावली आहे. यात विधानसभा मतदारसंघातील निवडणूक बाबत महत्वाचे निर्णय व पुढील दिशा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गट हा पदवीधर आमदार अरुण लाड व जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शरद लाड यांच्या माध्यमातून क्रांती कारखाना व उद्योगसमूहाच्या माध्यमातून स्वतंत्र गटाची आगे कूच करत आहे. या गटाने पूर्वीपासून देशमुख यांना साथ दिली आहे परंतु पदवीधर निवडणुकीत देशमुख व लाड हे एकमेकांच्या विरोधात होते.त्यांनतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळाले आमदारकी मिळाल्यानंतर क्रांती कारखान्याच्या माध्यमातून कडेगाव पलूस मध्ये अनेकांचे प्रवेश घेऊन घाटावर गट निर्माण केला आहे.लाड यांची येन वेळच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.