डॉ.विश्वजीत कदम यांनी ढोल ताशाच्या गजरात शक्तीप्रदर्शनाने केला उमेदवारी अर्ज दाखल

डॉ.विश्वजीत कदम यांनी ढोल ताशाच्या गजरात शक्तीप्रदर्शनाने केला उमेदवारी अर्ज
दाखल
कडेगांव : निवडणूक विशेष
दीपावलीच्या “वसुबारस” मुहूर्तावर महाविकास आघाडी कडून भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ.विश्वजीत कदम यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणुकीसाठी कडेगांव प्रांत कार्यालयात आज दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी अर्ज प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्याकडे दाखल करण्यात आला
. यावेळी जेष्ठ नेते मोहनराव कदम,श्रीमती जयमाला कदम,डॉ शिवाजीराव कदम, शांताराम कदम,महेंद्र आप्पा लाड,चंदुशेठ कदम, सौ.स्वप्नाली कदम भारती बँकेचे संचालक डॉ. जितेश कदम, दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम,तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, डॉ. पतंगराव कदम सोनहीरा कारखान्याचे व्हा.चेअरमन दीपक भोसले, ,शशिकांत माळी, जे के जाधव, उत्तमराव पवार यावेळी प्रमुख उपस्थित होते. मतदार संघातील नेते मंडळी विविध पदाधिकारी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.