संग्रामसिंह देशमुख यांना भाजपा महायुती कडुन उमेदवारी कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार कार्यकर्त्यांच्यात जल्लोष

संग्रामसिंह देशमुख यांना भाजपा महायुती कडुन उमेदवारी कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार कार्यकर्त्यांच्यात जल्लोष
कडेगाव: निवडणूक विशेष
कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघत महायुती कडुन माजी जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी भाजपा महायुती कडुन गुरूवार गुरू पुष्यामृत योग मुहुर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता भाजपा दुसऱ्या यादीत नाव नसल्याने मतदार संघात तर्कवितर्क लावले जात होते अखेर भाजपा महायुती कडुन देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्तानी फटाक्यांची आतषबाजी केली.
माजी जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता निवडक नेत्यां सोबत साध्या पद्धतीने गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले स्व.संपराव देशमुख यांच्या विचारांचा वसा व वारसा घेऊन प्रथमच निवडणुक लढवत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन महायुतीची उमेदवारी दिली आहे.हि निवडणूक मी कमळ चिन्हावर लढवत आहे
निवडणुक विकास कामावर लढवत असुन माझा विजय नक्की आहे.
महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन हि निवडणूक लढत असल्याचे संग्रामसिंह देशमुख यांनी शेवटी बोलताना सांगितले.