डॉ .विश्वजीत कदम यांनी साधला वसुबारसचा मुहूर्त, जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडी कडुन दाखल करणार उमेदवारी अर्ज

डॉ .विश्वजीत कदम यांनी साधला वसुबारसचा मुहूर्त, जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडी कडुन दाखल करणार उमेदवारी अर्ज
कडेगाव: निवडणूक विशेष
कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघत महाविकास आघाडी कडुन आ. विश्वजीत कदम हे तीसर्या वेळी सोमवार (दि.२८) वसुबारस मुहुर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
माजी मंत्री आ. विश्वजीत कदम पोटनिवडणुकीत बिनविरोध आमदार झाले २०१९ साली विधानसभा निवडणुकीत भाजपाचे संग्रामसिंह देशमुख हे इच्छुक असताना ही जागा युती मध्ये शिवसेनेला सुटली यात विश्वजीत कदम १ लाख ६२ मतांनी विजयी झाले व राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला.राज्याच्या मंत्री मंडळात अडीच वर्षे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले
यावेळी विकास कामांसाठी निधी आणला यानंतर सत्ता बददली तेव्हा कदम यांनी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक ज्वलनशील प्रश्न विधानसभेत मांडून अनेक प्रश्न निकाली काढले आहेत. भारती विद्यापीठ सह विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध करून लोकांचे प्रश्न सोडवण्यात ते ही आपल्या वडिलांप्रमाणे यशस्वी झाले. स्व. पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या हस्ते करुण देशातील अनेक मातब्बर खासदार,आमदार, मंत्री या अनावर कार्यक्रमासाठी आणून शक्ती प्रदर्शन करत विधानसभेचे रणशिंग फुंकले, मोटरसायकल रॅली व जाहिर सभा घेत सोमवारी महाविकास आघाडी कडुन कदम उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.सध्या या निवडणुकीत आमदार विश्वजीत कदम विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत.