ताज्या घडामोडी

संग्रामसिंह देशमुख यांनी साधला गुरु पुष्यामृत योग ! तर विश्वजीत कदम वसुबारस ला करणार उमेदवारी अर्ज दाखल

संग्रामसिंह देशमुख यांनी साधला गुरु पुष्यामृत योग ! तर विश्वजीत कदम वसुबारस ला करणार उमेदवारी अर्ज दाखल

कडेगाव: निवडणूक विशेष
कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघत कदम विरुद्ध देशमुख अशी दुसर्या पिढीतील पारंपारिक निवडणूक होत आहे महाविकास आघाडी कडुन आ. विश्वजीत कदम हे तीसर्या वेळी सोमवार (दि.२८) वसुबारस ला तर महायुती कडुन माजी जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे पहिल्यांदाच आज गुरूवार (दि .२४)गुरू पुष्यामृत योग मुहुर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
माजी मंत्री आ. विश्वजीत कदम पोटनिवडणुकीत बिनविरोध आमदार झाले २०१९ साली विधानसभा निवडणुकीत भाजपाचे संग्रामसिंह देशमुख हे इच्छुक असताना ही जागा युती मध्ये शिवसेनेला सुटली यात विश्वजीत कदम १ लाख ६२ मतांनी विजयी झाले व राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला.राज्याच्या मंत्री मंडळात अडीच वर्षे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले
यावेळी विकास कामांसाठी निधी आणला यानंतर सत्ता बददली तेव्हा कदम यांनी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक ज्वलनशील प्रश्न विधानसभेत मांडून अनेक प्रश्न निकाली काढले आहेत. भारती विद्यापीठ सह विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठा रोजगार उपलब्ध करून लोकांचे प्रश्न सोडवण्यात ते ही आपल्या वडिलांप्रमाणे यशस्वी झाले. स्व. पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या हस्ते करुण देशातील अनेक मातब्बर खासदार,आमदार, मंत्री या अनावर कार्यक्रमासाठी आणून शक्ती प्रदर्शन करत विधानसभेचे रणशिंग फुंकले सध्या या निवडणुकीत आमदार विश्वजीत कदम विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत.

कदम गटाचे प्रतिस्पर्धी म्हणून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी टेंभू योजनेचे शिल्पकार स्व.आमदार संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर या विधानसभा मतदारसंघातील देशमुख गटातील कार्यकर्त्यांना ताकद देऊन गट शाबू ठेवण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले.
भाजपाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली पृथ्वीराज देशमुख व युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्ह्यात सत्ता आणण्यासाठी लाख मोलाचे कष्ट घेत सत्ता काबीज केली. याची दखल पक्षाने घेतली व संग्रामसिंह देशमुख यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली तर पृथ्वीराज देशमुख त्यांना विधान परिषदेवर संधी दिली गेली. स्व. कदम यांच्या निधनानंतर आपण विधानसभेचे निवडणूक लढणार नसल्याचे पृथ्वीराज देशमुख यांनी जाहीर सभेत बोलून त्यांचे बंधू संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. संग्रामसिंह देशमुख यांनी टेंभू, ताकारीचे अनेक प्रश्नांवर तोडगा काढत मतदारसंघातील अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. कडेपूर येथे जनता दरबार भरून ते अनेक कार्यकर्त्यांचे प्रश्न निकाली काढत असतात. लोकांना सहज उपलब्ध होणे ही त्याची जमेची बाजू आहे. डोंगराई दूध संघ, ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याच्या माध्यमातून त्यांनीही मोठा रोजगार मतदार संघातील कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मतदार संघात प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे.
राज्यातील युती सरकारच्या नमो किसान,लाडली बहन यासारख्या अनेक लोक कल्याणकारी योजनाचा लाभ प्रभावीपणे मतदारसंघात मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.कडेगाव पलुस तालुक्यात कार्यकर्ते मेळावा घेऊन त्यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App