ताज्या घडामोडी

संग्रामसिंह देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिले तयारीला लागण्याचे आदेश ,कडेगाव पलुसमध्ये महायुतीचा झेंडा फडकविणार

संग्रामसिंह देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिले तयारीला लागण्याचे आदेश ,कडेगाव पलुसमध्ये महायुतीचा झेंडा फडकविणार

कडेगाव: निवडणूक विशेष प्रतिनिधी

येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कडेगाव पलुसमध्ये महायुतीचा झेंडा फडकविणार असल्याचा निर्धार युवा नेते व जि.प.माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केला त्याचबरोबर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे एकसंघपणे काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत ते कडेपूर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की कडेगाव पलुस मतदारसंघात जि.प.अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारकडून मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत गावगाड्यातील लोकांनी विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाभ दिला आहे बांधकाम मजूर शेतकरी महिला कष्टकरी या सर्वाना महायुती सकारने विविध योजनांच्या माध्यमातून मोठी ताकद दिली आहे तसेच आधार देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे कडेगाव पलुस मतदारसंघात केली आहेत या कामांच्या बळावरती जनता आपल्याला आशीर्वाद देईल कार्यकर्त्यांनी कोणतीही हयगय न करता मोठ्या ताकदीने कामाला लागावे अशा सुचना संग्रामसिंह देशमुख यांनी केल्या आहेत .
आपण या मतदारसंघात लोकांना केंद्रबिंदू मानून काम केले.लोकांचा स्वाभाविक जपण्याचे काम केलेले आहे.कोणाचीही अवहेलना केलेली नाही.जिल्हा परीषदेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक, उपाध्यक्ष पदावर असताना आपल्या सोबत असणाऱ्या व सोबत नसणाऱ्या लोकांची कामे केले.कोणत्याही कार्यकर्ते यांचा फोन दिवसरात्र अवेळी सुध्दा घेवून त्यांच्या अडचणी सोडविल्या आहेत.स्व.आमदार संपतराव देशमुख आण्यांच्या विचाराच्या बांधिलकी जपलेली आहे.आपण हि लढवणार व जिंकणार आहोत.त्यामुळे कार्यकर्ते यांनी नेटाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी विराट मेळाव्यात केले.
त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुध्दा मोठा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीया वरती गावागावात संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारात व्यस्त झाल्याचे दिसत आहेत सोशल मिडीयाच्या विविध गृपवर संग्रामसिंह देशमुख यांनी केलेल्या कामाच्या आठवणी लोकांपर्यंत पोहचवित आहेत या जनसंपर्कच्या माध्यमातून संग्रामसिंह देशमुख यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र कडेगाव पलुस मतदारसंघात दिसत आहे आगामी काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात असुन त्यामुळे या निवडणुकीत संग्रामसिंह देशमुख बाजी मारणार का हे पहावे लागेल

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App