जनसामान्य जनतेशी नाळ जोडलेले लोकनेते स्व.आमदार.संपतराव आण्णा देशमुख

जनसामान्य जनतेशी नाळ जोडलेले लोकनेते स्व.आमदार.संपतराव आण्णा देशमुख
स्वर्गीय संपतराव देशमुख म्हणजे सुसंस्कृत राजकारणी विकासाची गंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी योजनेचा त्यांनी केवळ पाठपुरावा केला नाही तर ती योजना वास्तवात आणली. नियतीने त्यांच्यावर क्रूर घाला घातला मात्र आपल्या आयुष्यात सुसंस्कृत राजकारण करणारा हा भगीरथ विकास गंगा आणि विचार गंगा मागे ठेवून गेला. पृथ्वीराजबाबा आणि संग्रामभाऊ देशमुख यांच्या रुपाने सुसंस्कृत राजकारणाची गंगा आजही प्रवाहित आहे.देशमुख घराण्याच्या सुसंस्कृत राजकारणामुळे आणि जनतेच्या विकासासाठी झटन्याच्या ध्येयामुळे टेंभू व ताकारी योजनेचे काम गतिमान झाले आहे. आणि त्याच पद्धतीने संपतराव देशमुख यांचे स्वप्न साकार करून दोघांनीही त्यांना अभिवादन करत राज्यात राजकारणाचा वस्तुपाठ घातला आहे.
संपतरावअण्णा यांचा जन्म पूर्वीच्या खानापूर व आत्ताच्या कडेगाव तालुक्यातील कडेपूर सारख्या छोट्या गावात चार एप्रिल 1939 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. शेती भरपूर असूनही कायमचा दुष्काळी भागातील कोरडवाहू शेती पावसाच्या लहरीपणावर येणारी शेती ही सांभाळणे मुश्कील झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कडेपूर येथे झाले. माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालय कराड येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सदगुरू घाडगे महाराज कॉलेज कराड येथे झाले. त्यांनी समाजकारण व राजकारण या प्रमाणे शिक्षणाची गुणवत्ता मिळवली होती. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉकॉलेज चा प्रवेश घेऊन विधी शाखेची पदवी संपादन केली.होती संपतराव अण्णांचा समाज कार्याचा ध्यास कॉलेज जीवनापासूनच होता. कराड येथे शिक्षणास असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नेतृत्व अण्णा करीत होते.अन्यायाच्या विरोधात लढणे हे अण्णा कॉलेज जीवनापासूनच करीत होते. त्यावेळी त्याचे समन्वयक मित्र विलासराव पाटील-उंडाळकर, विलासराव पाटील वाठारकर हे त्यांचे वर्गमित्र.
आज-काल समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात राहून स्वतः कधी सन्मान तर कधी अपमान सहन करून संपतराव देशमुख यांनी गावोगावी स्वतःचा एक प्रभावी विरोधी गट निर्माण केला. पण कधीही आपणास ज्या वाटेने जायचे नाही त्या वाटेने कधीच गेले नाहीत.वेळ प्रसंगी घरी बसू मात्र कोणाच्या दारात जाऊन लाळ घोटायची नाही.अशा करारी बाण्याचे अण्णा होते. अण्णांना पुण्या-मुंबई पेक्षाही कडेगाव पलूस से दोन्ही तालुक्यातील जनतेशी ऋणानुबंध होता. खानापूर पंचायत समिती,तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकांची कामे स्वतःच्या गाडीतून घेऊन वेळप्रसंगी जेवनाची शिदोरी आपल्याबरोबरच घेऊन, आपल्या घासातील एक घास ही गरिबांना भरविला. म्हणून मोठ मोठ्या ताकतिच्या विरोधाची आज संपतराव अण्णांनी निर्माण केलेली माणसे व त्या माणसांचा गट अजून देशमुख कुटुंबीयांवर प्रेम करीत आहेत, ही सर्व माणसांची मुद्दल अण्णांनी गोळा केली आहे. लोकांच्या निस्वार्थ प्रेमाचे हे देशमुख कुटुंबियांची शिदोरी आहे.ही शिदोरी जपण्याचे काम आजही पृथ्वीराजबाबा देशमुख, संग्रामभाऊ देशमुख,सतीश देशमुख व जयदीप देशमुख करीत आहेत.
जनसामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या लोकनेते. स्व.आमदार.संपतराव आण्णा देशमुख यांना विनम्र अभिवादन
प्रविण पवार कडेगांव