ढाणेवाडी रोजगार हमी योजनेच्या कामाची चौकशी होऊनही कारवाईस टाळाटाळ : आत्मदहनाचा इशारा

ढाणेवाडी रोजगार हमी योजनेच्या कामाची चौकशी होऊनही कारवाईस टाळाटाळ : आत्मदहनाचा इशारा
तात्काळ कारवाई न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते विकास माने व हणमंतराव ढाणे यांचा पंचायत समिती समोर आत्मदहन करण्याचा इशारा
कडेगाव प्रतिनिधी:
ढाणेवाडी ता कडेगाव येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहीर खुदाई कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे तक्रार व संबंधितावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास माने व हणमंतराव ढाणे यांनी जिल्हाधिकारी ,जिल्हा परिषद व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कडे केली होती. यांच अनुषंगाने वृत्तपत्रामध्ये यासंदर्भात बातमी येताच गटविकास अधिकारी यांनी दोन अधिकाऱ्यांची या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. चौकशी अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तक्रारदारान बोलवायच्या अगोदर संबंधित लाभार्थी याला बोलवून घेऊन मग तक्रारदारान बोलावण्यात आले.त्यामुळे अधिकारी हे तक्रारदारावर दबाव आणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत का अशी विचारणा केली असता लाभार्थीला चौकशी अधिकाऱ्यांकडून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. यावेळी चौकशी अधिकारी यांनी चौकशी करून दिलेली सबळ पुराव्याच्या आधारे दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात झालेल्या तक्रारींवर तीन चार दिवसात चौकशी अहवाल तयार करुन दोषींवर पुढील कारवाई करु असे सांगितले. पण त्यावेळी चौकशी अहवालामध्ये स्पष्ट पणे दिलेल्या पुराव्याने पोकलँन मशिन लावून बोगस मजुर दाखवून काम केल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यावेळी चौकशी अधिकारी यांनी चौकशी अहवालाचा संबंधिताकडुन 10 दिवसात खुलासा मागितला होता पण संबंधिताकडुन कोणताही खुलासा करण्यात आला नाही. विहीत मुदतीत मध्ये खुलासा सादर न केल्याने तक्रारदारानी पुढील कारवाई साठी विचारणा केली असता , अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.तसेच संबंधित लाभार्थी तसेच पंचायत समितीच्या अधिकारी यांच्याशी लागेबांधे असलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनकडुन तक्रारदारानां जिवे मारण्याच्या धमक्या , तसेच प्रकरण थांबवा अन्यथा खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकु अशा धमक्या देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पंचायत समितीचे चौकशी अधिकारी करीत आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारची या प्रकरणाची खातरजमा न करता तक्रारदार हे विविध प्रकारे दबाव टाकत आहेत.सोशल मीडियावर स्टेटस ठेवून तसेच समक्ष भेटुन अथवा फोनवरुन चौकशी करुन दबाव टाकत असल्याचे खोटे कारण दाखवून सदरील प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषदेकडुन करण्यात यावी असे पत्र जिल्हा परिषद ला पाठविले आहे.वास्तवीक पहाता, अधिकाऱ्यांकडून आम्ही कोणतेही माहीती मागितल्यास टाळटाळ करत होते. या प्रकरणाचे एक चौकशी अधिकारी तर ज्या विभागाची चौकशी करायची आहे विभागाचे प्रमुख आहेत ज्यांच्या अधिकाराखाली रोजगार हमी योजनेची कामे होतात . तसेच लाभार्थी तसेच दलालांनी दिलेल्या धमक्या चे काँल रिकाँर्डीग व , स्क्रीन शॉट सुध्दा उपलब्ध आहे तसेच यावर विचारणा केली असता टोलवाटोलवी करुन विषय दाबण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून होतोय यावरून स्पष्ट होतय की अधिकारी हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालून संबंधित अधिकारी व लाभार्थी ची पाठराखण करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. चौकशी अहवालाचा खुलासा सादर करण्यासाठी 10 दिवस मुदत देऊन सुद्धा चौकशी अधिकारी यांनी मुदत संपून गेली तरीही अद्याप पर्यंत कुठली कारवाई केली नाही. चौकशी अधिकारी यांनी चौकशी अहवाल सादर करुन संबंधिताना खुलासा सादर करण्यासाठी 10 दिवस मुदत देऊन 10 दिवसाची मुदत संपल्यावर तक्रारदारावर खोटे आरोप करून हे प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषद कडुन करण्यात यावी असे पत्र पाठवले आहे.यावरून असे लक्षात येते की चौकशी अधिकाऱ्यांनी संबंधिताना वाचवण्यासाठी 10 दिवस मुदत ही बोगस कागदपत्रे तयार करण्यासाठी दिली असलेल्याची साशंकता आहे.त्यामुळे सदरील चौकशी अधिकारी यांनी दिलेला अहवालामध्ये असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व अन्यथा पंचायत समिती कडेगाव या ठिकाणी ग्रामस्थांनासोबत घेऊन आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विकास माने व हणमंतराव ढाणे यांनी दिला आहे.