ताज्या घडामोडी

पलुस कडेगांव तालुक्यातील सुमारे ९४ घरकुलना मंजुरी :देशमुख यांचे कागदपत्रे सादर करणे,अधिक माहितीसाठी संपर्क साधाण्यासाठी आवाहन

पलुस कडेगांव तालुक्यातील सुमारे ९४ घरकुलना मंजुरी

Download Aadvaith Global APP

:देशमुख यांचे कागदपत्रे सादर करणे,अधिक माहितीसाठी संपर्क साधाण्यासाठी आवाहन

कडेपूर : प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत पलुस कडेगांव तालुक्यातील सुमारे ९४ घरकुलना मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिली. पात्र लाभार्थीनी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी या बाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहनही देशमुख यांनी केले.

देशमुख म्हणाले, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होत होता. परंतु मध्यंतरी अडीच वर्षाच्या काळासाठी आघाडीचे सरकार आले आणि ही योजना ठप्प झाली. आता पुन्हा आपले महायुतीचे सरकार आल्यानंतर या योजनेला चालना मिळाली असुन त्यामध्ये कडेगांव तालुक्यातील ७२ तर पलुस तालुक्यातील २२अशा एकुण ९४ घरकुलाना मंजुरी मिळाली आहे.

या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,ना. चंद्रकांत दादा पाटील, ना. अतुल सावे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश खाडे,माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांचे सहकार्य मिळाल्याचे संग्राम देशमुख यांनी सांगितले.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App