ताज्या घडामोडी

शूटिंगबॉल असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख

शूटिंगबॉल असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्षपदी संग्रामसिंह देशमुख
कडेगांव/प्रतिनिधी
अॅमॅच्युअर शूटिंगबॉल असोसिएशन (महाराष्ट्र) संघटनेच्या अध्यक्षपदी संग्रामभाऊ देशमुख (सांगली) यांची निवड करण्यात आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Download Aadvaith Global APP

दि. 22 डिसेंबर, 2023 रोजी नांदगाव, जिल्हा नाशिक येथे ॲमॅच्योअर शूटिंगबॉल असोसिएशनची (महाराष्ट्र) विशेष सभा पार पडली. या सभेत रिक्त पदे भरण्याबाबत निर्णय घेण्यात आले. नॅशनल स्पोर्ट्स कोड 2011 नुसार वय वर्षे 70+ असलेल्या व्यक्तींना संविधानिक पदावर राहता येत नसल्याने मनोहर नाना साळवी हे आता या असोसिएशनचे मुख्य संरक्षक व मार्गदर्शक म्हणून नेहमीच आपल्या सोबत असणार आहेत. नानांचे योगदान नक्कीच सर्वोच्च आहे. त्यांचे रिक्त झालेल्या अध्यक्ष पदावर
संग्राम भाऊ देशमुख यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर असोसिएशनचे सचिव विष्णू निकम यांनी राजीनामा दिला असल्याकारणाने रिक्त झालेल्या सचिव पदावर अतुल निकम यांची निवड करण्यात आली.
तसेच असोसिएशनच्या इतर रिक्त पदांवर खालील प्रमाणे निवड करण्यात आलेली आहेत, उपाध्यक्ष- रणजीत (नाना) काळे सहसचिव सुनील कंठाळे, कार्यकारणी सदस्य- राजेंद्र मोहिते,विष्णू निकम, आजीवन सभासद- पांडुरंग कदम, प्रकाश भावसार, राजेंद्र घुमटकर,हनुमंत पवार, बाळासाहेब भोंडवे, प्रशांत पवार यांची रिक्त पदांवर नेमणूक करण्यात आली. सदरची विशेष सभा संघटनेचे उपाध्यक्ष- जयवंतदादा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी खजिनदार- शकीलुद्दीन काजी, सहसचिव- टी. एस. रामनबैनवाड, तांत्रिक समिती प्रमुख-सदाशिव माने, कार्यकारणी सदस्य-चंद्रशेखर कण्हेरकर त्र्यंबक राजे, साजिद अख्तर, सौ. सपना चव्हाण, आजीव सदस्य अनिल पाटील, मोहम्मद साकिब, राजेंद्र पुजारी, सुनिल कंठाळे, राजेंद्र मोहिते, अतुल विष्णू निकम आदी उपस्थित होते.
असोसिएशनच्या मुख्य संरक्षक पदी- मनोहरनाना साळवी, नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास अण्णा कांदे, डॉ. राजेंद्र विखे पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
सदर निवडीचे समस्त शूटिंगबाॅल खेळाडू, शूटिंगबाॅल प्रेमी हितचिंतक,आयोजक यांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App