महाराष्ट्रराजकीय

आघाडीबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल: माजी मंत्री डॉ.कदम

 

Download Aadvaith Global APP

आघाडीबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल: माजी मंत्री डॉ.कदम
कडेगाव :

आगामी जि. प. व पं. स. निवडणूकीत मित्र पक्षांशी आघाडीबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल.त्यासाठी काँग्रेसचे सर्व नेतेमंडळी,कार्यकर्ते यांचे मत विचारात घेतली जातील त्यानंतरच आघाडीबाबत काय तो निर्णय घेण्यात येईल तरुण उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत अशी माहिती आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.
कडेगाव आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते माजी मंत्री बाळासाहेब पाटील, युवा नेते डॉ.जितेश कदम उपस्थित होते.
डॉ.कदम म्हणाले,जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणूका काँग्रेस पक्ष ताकदीने व जोमाने लढवणार आहे.त्यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस नेते,कार्यकर्ते व यांच्याबरोबर बैठका सुरु केल्या आहेत.तसेच मित्रपक्षांबरोबरही बोलणी सुरु आहेत.
जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन ताकदीने कामाला लागलो आहे.त्यासाठी जिल्हाभर कार्यकर्त्याचे मेळावे,बैठकांचे आयोजन केले जाणार आहे.काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवून जिल्ह्यात काँग्रेसची भक्कमपणे उभारणी केली जाईल. अशा रीतीने जिल्हा ढवळून काढून सर्वत्र काँग्रेसमय वातावरण निर्माण केले जाईल. तर आगामी सर्व निवडणुकांसाठी सध्या अनेक इच्छुक असले तरी सर्वाची मते विचारात घेवून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत पक्ष निर्णय घेईल.

………………………………………………….

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App