ताज्या घडामोडी

रामनवमीचा 185 वर्षाचा भक्तीमय परंपरेचे तप, कडेगावकर दरवर्षी करतात रामलल्लाच्या भक्तीचा जप 

रामनवमीचा 185 वर्षाचा भक्तीमय परंपरेचे तप, कडेगावकर दरवर्षी करतात रामलल्लाच्या भक्तीचा जप 

Download Aadvaith Global APP

कडेगाव:

कडेगाव म्हटलं की राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक असं संबोधलं जात. हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोहरम सण, रामनवमी उत्सव, भैरवनाथ गोविंदगिरी उत्सव हे सर्व जातीय ग्रामस्थ सलोख्याने व एकदिलाने एक जिवाने आनंदोत्सव साजरा करत असतात असे हे राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक असलेल्या कडेगावात रामनवमी उत्सवाची परंपरा गेली 185 वर्ष अव्यातपणे सुरू आहे. सामाजिक ऐक्याच्या व एकतेच्या कसोटीवर लाभलेल्या रामनवमी उत्सव एक आदर्श मानदंड मानला जात आहे. कडेगावच्या रामनवमीचे वेगळी वैशिष्ट्य कोणती 185 वर्ष कशी व कोणी निर्माण केली? स्वखर्चाने गेल्या सहा पिढ्यापासून रामनवमी उत्सव कसा चालतो ?या उत्सवाचे गावाला किंवा समाजाला कोणते योगदान दिले आहे? या निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा शोध श्री राम जन्मभूमी मंदिर अयोध्याच्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आपण आढावा घेऊया . 185 वर्षांपूर्वी संस्थान आणि देशपांडे यांच्या श्री विठ्ठल रुकमाई मंदिरात राघवेंद्र स्वामी यांची रामायणावर सुश्राव्य प्रवचने होत होती. रामायण प्रत्येकच्या जीवनाचा विषय आहे रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपल्याला भेटणारी पात्रे प्रत्येक स्वभावाची ,प्रत्येकप्रवृतीची,कदाचित यामुळेच या पात्राचंच नेहमी आपल्या मनात अढळ स्थान आहे.यामुळेच या रामायण कथेची गोडी ग्रामस्थांना चांगली लागली यातून कडेगाव येथे रामनवमी उत्सव साजरा होण्यासाठी पाऊल उचलण्यात आले अन् समर्थ रामदासाप्रमाणे कडेगावात ही रामनवमी उत्सव सुरू करावा त्याप्रमाणे 1761 व इसवी सन 1839 साली या रामनवमी उत्सवात प्रारंभ झाला .कडेगावलाव पुण्याहून येऊन रामनवमी साजरी करण्याची जबाबदारी रामकृष्ण बुवा माटे व त्यांचे शिष्य पंडित बुवा यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांचे वंशज नारायणराव माटे व त्यांचे चिरंजीव अभय माटे आजही सहकुटुंब येऊन कडेगाव येथे रामनवमी उत्सवात सहभागी होऊन यशस्वीपणे रामनवमी उत्सव साजरा करतात सन 1925 साली रहिमतपूरचे राम उपासक कै अतीतकर यांनी राम, सीता, लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्तीची स्थापना कडेगाव येथील राम मंदिरात केली . कालेकर बुवा स्वामी, विष्णुबुवा सिद्ध ,आळंदीचे नरसिंह सरस्वती, पुण्याचे जंगली महाराज यांनी या राम मंदिरात मुक्काम करून ग्रामस्थांना राम भक्तीबरोबरच आशीर्वाद दिले आहेत तर श्रीधर स्वामी, शिरोळकर स्वामी, वाडीकर जेरे स्वामी, कोल्हापूरचे घुमरे स्वामी ,वाडीचे शंकर स्वामी तसेच गोंदवले महाराज यांच्या वास्तवाने मंदिर पुनित पावन

 झाले आहे. हवालदार कुटुंबियाकडून ध्वज आणून त्याची उभारणी करून तसेच श्रीमंत देशपांडे कडून छबिण्याची मारुतीची मूर्ती आणून उत्सवाला प्रारंभ होतो असा हा गेली 185 वर्ष परंपरा असलेला रामनवमी उत्सव कडेगावकरांच्या रामलल्लाच्या भक्तीचा दरवर्षी होणारा रामभक्तीच्या जपाचा दरवर्षी सोहळा साजरा होत असतो.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App