महाराष्ट्रराजकीय

स्व.आ.डॉ.पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळी संसदरत्न खा.सुप्रिया सुळे (ताई) यांची सदिच्छा भेट

स्व.आ.डॉ.पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळी संसदरत्न खा.सुप्रिया सुळे (ताई) यांची सदिच्छा भेट

Download Aadvaith Global APP

कडेगांव :- संसदरत्न मा.खासदार सुप्रिया सुळे (ताई) यांनी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथील स्व.आ.डॉ.पतंगराव कदम समाधीस्थळी सदिच्छा भेट देवून विनम्र अभिवादन केले.

 

            या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना खा. सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते स्व.आ.डॉ.पतंगराव कदम साहेब यांनी महाराष्ट्रासह सांगली जिल्हा व पलूस-कडेगांव मतदारसंघाचा केलेला सर्वांगिण कायापालट उल्लेखनीय आहे. आजरोजी स्व.आ.डॉ.पतंगराव कदम साहेबांचे पावलावर पाऊल ठेवत आ.डॉ.विश्वजित कदम यांची कामाची सर्व क्षेत्रातील घोडदौड सुरु असून स्व.आ.डॉ.पतंगराव कदम साहेब यांची उणीव भासू देत नाहीत. त्यामुळेच आ.डॉ.विश्वजीत कदम यांचे काम वाखाणण्यासारखे आहे. दुष्काळी भागात अशी माणसे जन्माला येणे हे इथल्या लोकांचे जणू भाग्यच आहे. तदनंतर स्व.आ.डॉ.पतंगराव कदम साहेबांचे उभारणी समाधी स्मारकाचा आराखडा आ.डॉ.विश्वजित कदम यांचेकडून जाणून घेवून चालू असलेल्या बांधकामाची पाहणी केली.

 

               तसेच कारखाना प्रशासकीय कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता कारखान्याचे देशात व राज्यात सर्व मानाचे पुरस्कार मिळवून झालेले नाव व प्रत्यक्ष कारखान्याचा सर्व परिसर, बाग-बगीच्या व वृक्षलागवड इ. मुळे एकेकाळी ओसाड असलेले माळरान कारखाना व कदम कुटुंबीयांमुळे आजमितीस नंदनवन झाल्याचे दिसून येत आहे. याचे सर्व श्रेय स्व.आ.डॉ.पतंगराव कदम साहेब व त्यांचे जेष्ठ बंधू व संस्थेचे अध्यक्ष आ.वनश्री मोहनराव कदम यांचे व आपणा सर्व कदम कुटुंबियांचे आहे. याबद्दल त्यांनी मा.आ.वनश्री मोहनराव कदम सह सर्व संचालक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केल.

 

             यावेळी जि.प.सदस्य शरद लाड,जि.प.च्या माजी अध्यक्षा मालन मोहिते,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव,जि.प.माजी सदस्य सुरेश मोहिते,सुनिल जगदाळे, कार्यकारी संचालक . शरद कदम यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

            

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App