राजकीय

विरोधी गट नेत्यांचे आरोप बिनबुडाचे व पाकीट मिळवण्यासाठीचे : नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांचा पलटवार

विरोधी गट नेत्यांचे आरोप बिनबुडाचे व पाकीट मिळवण्यासाठीचे : नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांचा पलटवार

Download Aadvaith Global APP

 

 

 कडेगावः प्रतिनिधी.

 

 कडेगाव नगरपंचायतीच्या कारभारा बाबत विरोधी गटाकडून होत आहे.मात्र पाच वषै कितीही बिन बुडाचे आरोप केले तरी पाकीट संस्कृतीही भाजपच्या नितीत बसत नाही.ती आमच्या काळात पुर्णपणे बंद केलेली आहे. यामुळे पाकिट संस्कृती मधील काहि अपेक्षा ठेवून आहेत.मात्र त्यांच्या बिनबुडाच्या आरोपांना भिड घालणार नाही. भविष्यात दखलही घेतली जाणार नाही. असे प्रतिपादन कडेगाव नगरपंचातीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैया यांनी कडेगाव नगरपंचायतीच्या दालनात आयोजित पत्रकार परीषदेत केले.

कडेगाव शहरातील नागरीकांनी विरोधकांच्या पाकीट संस्कृती व खाबुगिरी कटांळून सत्ता आमच्या ताब्यात दिली आहे. त्यांच्या विश्वासाला कोठेही तडा जाणार नाही याची पूर्णपणे दक्षता आम्ही घेत आहोत,जे काय बिनगुडाचे आरोप विरोधी गटाचे गटनेते करत आहेत तो एक पाकीट मिळवण्यासाठी चाललेली धडपड, व वरिष्ठ नेत्याना दाखवण्यासाठीचा दिखावा आहे, पण वरिष्ठ नेत्यांना देखील त्यांची पाकीट संस्कृती माहिती आहे.

 जिल्हाधिकारी यांच्या कडे केलेल्या तक्रारीस नगरपंचातीचे मुख्याधिकारी यांनी सर्व माहिती लेखी देण्यात आली आहे. यांच्या प्रत्येक बिनबुडाच्या आरोपाला येथून पुढे उत्तर देण्यापेक्षा आम्ही बांधिल नाही कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देणार कामकाज करीत असताना गटतट , जात व कोणाचा प्रभाग न पाहता.सर्वागिण विकास करण्यात येणार आहे.

       माझ्यासह भाजपाचे सर्व 12 नगरसेवक हे चांगल्यापद्धतीने सक्षम,कर्तव्यदक्ष व आर्थिक संपन्न आहेत.

       पत्रकार परीषदेत धनंजय देशमुख पुढे म्हणाले की नगरपंचायतीचा स्वच्छता ठेका हा काँग्रेस काळात दिले गेलेला आहे व त्याचे मोजमाफ ,लांबी व टेंडर हे काँग्रेसच्या काळात झालेले आहे, शहरांमध्ये अस्वच्छता जास्त झाली होती त्यामुळे तातडीने वर्क आँडर दिली. काँग्रेसच्या पक्षांतर्गत गटबाजी असल्यामुळे यांनी हा बिनबोडाचा आरोप केलेला आहे, नगराध्यक्ष ड्रायव्हर हा शासनाच्या नियमाप्रमाणे नगराध्यक्षांना मागणीप्रमाणे देता येतो अशी तरतूद आहे, नगरपंचायतीच्या मिटींगचे विषय हे प्रत्येक नागरिकाला नगरपंचायतीने देणे बंधनकारक आहे, प्रत्येक नागरिक त्याची मागणी करून नगरपंचायतीकडून माहिती घेऊ शकतो, बांधकाम परवाने व व्यवसाय परवाने हे सध्याचे गटनेते हे सरपंच असताना त्यांची त्यामध्ये मास्टरकीच मिळवलेली होती, पण ही ग्रामपंचायत नसून नगरपंचायत आहे याचे भान त्यांनी ठेवावे, कचरा विलगीकरणाचे बांधकाम देखील आम्ही सत्तेत आल्यानंतर पूर्ण केली व कचरा विलगीकरणाची यंत्रणा आम्ही नगरपंचायतीच्या आवारातून त्या ठिकाणी नेऊन त्याची लवकरच काम सुरू होत आहे, नगरपंचायतीच्या कारभारात कोठेही तसूभरही कसूर आढळून आल्यास जात्या वेळेस कठोर कारवाई करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले,व या सर्व बिन बुडाच्या आरोपांचे लेखी उत्तर नगरपंचायत प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी, विरोधी गटनेते यांना दिलेले आहे.माझा व्यक्ती गत व्यवसाय व शेतीतून पंधराशे टन ऊस जातो. व्यवसायातून लाखो रूपये मिळतात यामुळे नगरपंचातीची दमडी चोरणे माझ्या कुटुंबाच्या रक्तात नाही. विरोधकांना नगरपंचातीचे मुख्याधिकारी सर्व उत्तरे दिली आहेत.कडेगाव शहरातील सर्व प्रभागात प्रगती कामे करणे व कडेगाव स्वच्छ, सुंदर व सेवायुक्त असावे भविष्यात धोरण आहे.कडेगाव शहरातील सर्व जागा व रस्ते यांचा प्रायमरीसर्वे झाला आहे. या कुरघोडी व तक्रार यांची दखल न घेता.कामावरच लक्ष देणार आहे.

 यावेळी उपनगराध्यक्ष गायकवाड, नगरसेवक अमोल डांगे, आशपाक पठाण,हाजी.मूकतार पटेल,निलेश लंगडे, अभिजीत लोखंडे उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App