महाराष्ट्रराजकीय

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या कडेगावला भरघोस निधी देणार :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या कडेगावला भरघोस निधी देणार :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Download Aadvaith Global APP

 

 

 

कडेगांव प्रतिनिधी

कडेगाव नगरपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवतीर्थ व्हावे, तसेच जगप्रसिद्ध ख्याती असलेल्या कडेगाव मोहरम यात्रेला तीर्थक्षेत्रात घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष मा.आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
या निवेदनात कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करण्यात आलेली असून निवेदनामध्ये कडेगाव शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवतीर्थ, व जगप्रसिद्ध कडेगाव मोहरम यात्रेचे तीर्थक्षेत्रात सामावून घेण्याबाबत तसेच भुयारी गटार, 24 तास पिण्याचे शुद्ध पाणी,शहरातील गरजू लोकांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून जास्तीत जास्त घरे देण्यात यावीत व कडेगाव शहरातील सर्वात मोठी व ज्वलनशील समस्या गावठाण हद्दवाढ लवकरात लवकर मंजूर करण्यातयावी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या कडेगाव शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App