क्रीडा व मनोरंजनराजकीय

पृथ्वी संग्राम युथ फाउंडेशनची दहीहंडी शिवनेरी संघाने फोडली, पलुस मध्ये जल्लोष प्रेक्षकांची मोठी गर्दी

पृथ्वी संग्राम युथ फाउंडेशनची दहीहंडी शिवनेरी संघाने फोडली,

Download Aadvaith Global APP

पलुस मध्ये जल्लोष प्रेक्षकांची मोठी गर्दी

कडेपूर : प्रतिनिधी.
पलुस येथे पृथ्वी संग्राम युथ फाऊंडेशनतर्फे गुरूवारी आयोजित १लाख २१ हजार १२१ रुपये बक्षिसाची दहीहंडी शिवनेरीसंघ तासगाव (जि.सांगली) या संघाने फोडली.
पलुस येथील जुने बस स्टँडमागील, बाजार मैदानवर डीजेच्या दणदणाटामध्ये सुमारे पाच तास दहीहंडीचा जल्लोष सुरू होता. सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो नागरिकांनी मैदानावर गर्दी केली होती. मैदानावरवर क्रेनच्या साहाय्याने दहीहंडी बांधली होती. चित्ताकर्षक सजावट केलेली दहीहंडी तासगवच्या शिवनेरी संघाने दहीहंडी सात थर देऊन फोडली, डीजेच्या दणदणाटासह,डीजे सिस्टीम, लेसर शो, बॉलीवूड डान्स ग्रुपचा सहभाग यामुळे दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला. जास्त उंचीमुळे दोन्ही संघ सलामी देऊन थांबत होते.


हंडी हाताला येत नव्हती. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हंडी काही फुटांनी खाली घेण्यात आल्यानंतर शिवनेरी संघ तासगाव या संघाने दुसऱ्या प्रयत्नात हंडी फोडली. त्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. विजेत्या संघाला सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख, पृथ्वी संगम युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहितनाना पाटील यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.यावेळी विश्वतेज देशमुख, जयराज देशमुख, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मा.आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, संग्राम भाऊ देशमुख,रोहित नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “पृथ्वी संग्राम युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नेटके संयोजन पलूस येथे केले होते.

तरुणाईला राजकीय व चित्रपट तारकांचे आकर्षण
दहीहंडी सोहळ्यासाठी मा.खा.निलेश राणे, आमदार शहाजी बापू पाटील व चित्रपटातील तारे-तारकांनीही उपस्थिती लावली. त्यांच्या सहभागाने सोहळ्याचा जल्लोष आणखी वाढला. सिनेअभिनेत्री व नृत्यांगना
मानसी नाईक यांच्या नृत्य व अदाकारीने सोहळ्याची रंगत वाढविली.

 

 

काय ती ” पृथ्वीसंग्रामची ” दहीहंडी,
काय तो पलूस कडेगावकरांचा उत्साह
येणाऱ्या निवडणुकीत संग्रामभाऊ देशमुख आमदार ओके ” आ.शहाजीबापू पाटील.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App