महाराष्ट्रराजकीय

आ.डॉ.विश्वजीत कदम प्रतिष्ठानची कडेगावमध्ये आज दहीहंडी 

आ.डॉ.विश्वजीत कदम प्रतिष्ठानची कडेगावमध्ये आज दहीहंडी 

Download Aadvaith Global APP

 

कडेगाव : प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रात अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या डॉ.विश्वजीत कदम प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात रविवार दि.२१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा. आमदार मोहनराव कदम यांच्या शुभहस्ते व राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार असून, यावेळी सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रम दादा सावंत, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम कदम, महेंद्र आप्पा लाड यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भारती बँकेचे संचालक डॉ.जितेश कदम यांनी दिली.

 

यावेळी बोलताना डॉ.जितेश कदम म्हणाले, सन २०१३ पासून कडेगाव तालुक्यात आ.डॉ.विश्वजीत कदम प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमतः दहीहंडी उत्सवाची सुरुवात करण्यात आली होती, अगदी अल्पावधीतच या दहीहंडीने पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला होता, परंतु गेल्या पाच वर्षांत महापूर, दुष्काळ, कोरोना सारख्या अडचणी एका मागून एक आल्याने आपण हा उत्सव करू शकलो नाही, परंतु आता परिस्थिती बदलत असल्याने, आपण पुन्हा नव्या जोमाने आपल्या परंपरेतील अतिशय महत्वाचा असा दहीहंडीचा उत्सव साजरा करणार असल्याचे ते म्हणाले, या दहीहंडी साठी आयोजन समितीने ९९ हजार ९९९ रुपयांचे आकर्षक बक्षीस ठेवले आहे. या दहीहंडी उत्सवाच्या थरार वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील प्रतिष्ठित गोविंदापथक उपस्थित राहून आपला थरार दाखवणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तरी कडेगावसह तालुक्यातील ग्रामस्थांनी या उत्सवात आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन यावेळी युवा नेते डॉ.जितेश कदम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

सिनेअभिनेत्री श्रुती मराठे व प्राजक्ता गायकवाड यांची उपस्थिती…

 

सिनेअभिनेत्री श्रुती मराठे व स्वराज रक्षक संभाजी या मालिकेतील येसुबाई फेम प्राजक्ता गायकवाड या दहीहंडीच्या निमित्ताने कडेगावकरांच्या भेटीला येणार असून त्यांची उपस्थितीही खास आकर्षण ठरणार असल्याची माहिती यावेळी आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

 

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App