राजकीय

संग्रामभाऊंची वचनपूर्ती; ढाणेवाडी नळपाणी योजनेस ८४ लाख मंजूर.

संग्रामभाऊंची वचनपूर्ती; ढाणेवाडी नळपाणी योजनेस ८४ लाख मंजूर.

Download Aadvaith Global APP

कडेपूर :प्रतिनिधी
                     कडेगाव तालुक्यातील ढाणेवाडी गावासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेची निविदा प्रसिध्दीस काढण्यात आली आहे. त्यासाठी ८४ लाख २१हजार ४७३ रुपयांचा निधी व सदरील योजना हि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाली आहे.

           ढाणेवाडी गावाच्या काही अंतरापासून टेंभू योजनेचे पाणी गेले असले तरी हे गाव अनेक वर्षांपासून पाण्याविना वंचित आहे.गावात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसह पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना शेकडो मैल भटकंती करून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी जि. प. अध्यक्ष असताना नेवरी प्रादेशिक योजनेच्या माध्यमातून गावाच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली होती तसेच या गावच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी जिल्हा परिषेदेत अध्यक्ष असताना या योजनेसाठी अथक प्रयत्न केले होते.त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेतून प्रत्येक घरास पिण्याच्या पाणी मिळणार आहे. ढाणेवाडी गावाला मंजूर नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे.यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या अथक प्रयत्नातून सदर योजना मंजूर करण्यात आली असल्याचे माहिती ढाणेवाडीचे नेते विकास माने व माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंतराव ढाणे यांनी दिली.

फोटो: संग्रामभाऊ देशमुख

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App