क्राईममहाराष्ट्रराजकीय

वाळू तस्करावर कठोर कारवाईसाठी रिपब्लिकन पक्ष , शेतकरी संघटना उद्या रात्री १२ ला काढणार कडेगाव तहसिलवर मशाल मोर्चा.

वाळू तस्करावर कठोर कारवाईसाठी

Download Aadvaith Global APP

रिपब्लिकन पक्ष , शेतकरी संघटना उद्या रात्री १२ ला काढणार कडेगाव तहसिलवर मशाल मोर्चा.

 

 कडेगाव : प्रतिनिधी

कडेगाव तहसिल प्रशासना कडून तालुक्यातील वाळू तस्करावर कठोर कारवाई चे नियोजन करावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)व शेतकरी संघटना गेली सहा महिन्यापासून वेळोवेळी आंदोलने करीत आहेत. तरी ही कडेगाव तहसिल प्रशासन वाळू तस्करांवर कठोर कारवाई साठी गंभीर नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. महसुल प्रशासनाच्या विरोधात मंगळवारी रोजी तहसिल कार्यालय गेटवर रात्री १२ वाजता “मशाल” मोर्चा काढणार आहेत याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी गणेश मरकड यांना देण्यात आले आहे.

     या उलट तहसिल प्रशासन वैद्य वाळू चोरांना सुपारी देऊन आंदोलकांना दमदाटीचे प्रकार घडवून आणत आहे. चार दिवसापूर्वी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी यांच्या बाबतीत तसा गंभीर प्रकार घडला आहे, या अवैद्य वाळू चोरांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. असे गंभीर प्रकार घडत असताना त्याच्या उलट सध्या अतिशय जोमाने रात्रीच्या वेळी अवैद्य वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे.आणि कडेगाव तहसिल प्रशासन मात्र अवैध वाळू तस्करांवर कठोर कारवाईचे नियोजन न करता झोपेचे सोंग घेत आहे. याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए-आंबेडकर) व शेतकरी संघटना मंगळवारी रोजी तहसिल कार्यालय गेटवर रात्री १२ वाजता “मशाल” मोर्चा काढणार आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App