ताज्या घडामोडी

एम् पी एस् सी राज्यसेवेच्या परीक्षेतून शिवव्याख्याते ओंकार औंधे यांची राजमुद्रित अधिकारी म्हणून निवड

एम् पी एस् सी राज्यसेवेच्या परीक्षेतून शिवव्याख्याते ओंकार औंधे यांची राजमुद्रित अधिकारी म्हणून निवड
कडेगाव
एम् पी एस् सी राज्यसेवेच्या परिक्षेतून वांगी ता.कडेगाव येथील शिवव्याख्याते ओंकार बाळासाहेब औंधे यांची राजमुद्रित अधिकारी म्हणून निवड झाली
वांगी येथील प्रसिध्द शिवव्याख्याते आणी क्रांती सह साखर कारखान्याचे स्व.संचालक बाळासाहेब औंधे यांचे चिरंजीव ओंकार औंधे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परिक्षेतून राजमुद्रित संवर्गातील अधिकारी पदासाठी निवड झाली आहे दि.१८ जानेवारी रोजी लोकसेवा आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रायोगिक निवड यादीमधुन त्यांची या पदासाठी निवड झाली आहे ते व्यवस्थापन शास्त्रामध्ये पदवी त्यांनी प्राप्त केलेली असुन ते गेली तिन ते चार वर्षे ते या राज्यसेवा परिक्षेची तयारी करीत आहेत या काळात त्यांची गेल्या वेळेस मुलाखतीतून निवडीची संधी हुकली होती यावेळी मात्र त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन यशाला गवसणी घातली आहे
स्व.बाळासाहेब औंधे यांच्या लोकसेवेच्या असणाऱ्या भुमिकेचा आशिर्वाद त्यांना मिळाल्याची भावना सामान्यातून होत आहे त्यांच्या वडिलांनी आपले आयुष्यच लोकांच्या सेवेसाठी राजकीय क्षेत्रात वाहिलेले होते क्रांती अग्रणी जि.डी.बापूसो लाड असतील किंवा स्व.संपतरावजी देशमुख असतील यांच्याशी पूर्वाधीपासुनच सौख्याचे संबंध असलेले बाळासाहेब औंधे यांनी नेहमीच त्यांच्या अपत्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती त्यांचा असणारा सेवाभावी वृत्तीचा विचार घेऊनच त्यांची दोन नंबरची मुलगी अरूणा औंधे या देखील पोलीस निरीक्षकपदी काम करीत आहे आपल्या असणाऱ्या बहिणीच्या माध्यमातूच त्यांनी आदर्श घेऊन अल्पावधीतच साडेतीन वर्षातच दुसऱ्याच प्रयत्नात या परिक्षेतून आपली निवड साध्य केलेली आहे त्यांच्या या अभ्यासामध्ये त्यांना मुख्याधिकारी असलेले विशाल पाटील त्यांची बहिण अरुणा औंधे-पाटील आई मिना औंधे त्याचप्रमाणे चैतन्य काळे सर याचसोबत त्यांच्या बरोबर असणाऱा मित्र परिवार कुटुंबिय यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे ओंकार यांच्या वडिलांच्या निधनानंतर देखील त्यांच्या आई असणाऱ्या मिना औंधे यांनी यांनी या सर्व मुलांना अतिशय धडाडीने आणी जिद्दीने शिक्षण देण्याचे काम केले आणी अतिशय प्रतिकुल परस्थितीत देखील संसार कोलमडलेला असताना देखील ठामपणाने या मुलांना एक सक्षमपणे बापाची असणारी कमतरता भरून काढण्याचे काम केले आणी याच असणाऱ्या आपल्या आईच्या असणाऱ्या संघर्षाची जाणीव ठेवून या मुलांनी यशाला गवसणी घातली आहे

Download Aadvaith Global APP

आईसारखी माया लावणाऱ्या बहिणीने दिली प्रेरणा

बहिण अरुणा औंधे यांची प्रेरणा आणी साथ दिल्याने एकाच कुटुंबातील दोघे भाऊ आणी बहिण अधिकारी झाल्याने लोक प्रशासनामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत लोकांच्या लोकसेवेची भुमिका या दोघांनाही त्यांच्या वडिलाकडुनच मिळालेली आहे अरुणा यांनी गेल्या तेरा वर्षामध्ये निष्कलंक आणि एकतत्पर अधिकारी म्हणून नाव पोलीस विभागात कमावले आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App