ताज्या घडामोडी

तुलसी पत्रावर साकारले विठ्ठलाचे चित्र कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांचा स्तुत्य उपक्रम

तुलसी पत्रावर साकारले विठ्ठलाचे चित्र
कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांचा स्तुत्य उपक्रम

Download Aadvaith Global APP

ग्रामीण भागात प्रत्येक घरात किंवा घरासमोर तुळशीचे वृंदावन असते,शहरामध्ये अनेकांकडे वृंदावन नसले तरी तुळशीचे रोपटे असते.तुळस ही आपल्या शरीराला अनेक फायदेशीर आहे ,तुळशीमुळे कॅन्सर,किडनी स्टोन कमी करणे,डोके दुःखी,शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणे अशा अनेक आजारांना उपयोगी पडते .आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या वारीला जाताना प्रत्येक स्त्री वारकरीच्या डोक्यावर तुळस ही असतेच*. *म्हणून तिला देवत्व बहाल केल आहे. एखाद्या शुभप्रसंगी सर्वत्र तुळशी पत्राने जल शिंपडून तेथील पावित्र्य निर्माण केले जाते. श्री विठ्ठलाला तुळस वाहल्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे तुळस श्री लक्ष्मीची प्रतीक आहे. व श्री लक्ष्मी ही विष्णूची पत्नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हे श्री विष्णूचे रूप आहे) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी राहते .आषाढी एकादशीचे औचित्य साधून भारती विद्यापीठाच्या अभिजीत कदम प्रशाला ज्युनिअर कॉलेज व्यवसाय शिक्षण अमरापूर शाळेतील उपक्रमशील कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांनी

 

 

 तुलसीच्या पत्रावर श्री विठ्ठलाचे चित्र अकरालिक* *कलर च्या माध्यमातून साकारले आहे या तुलसी पत्राची साईज अवघी 4 बाय 2 सेंटीमीटर एवढी आहे. हे चित्र त्यांनी अवघ्या पंचवीस मिनिटात साकारले आहे .त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ.विश्वजीत कदम तथा बाळासाहेब ,भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा आदरणीय विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब,भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाचे संचालक आदरणीय एम डी कदम सर , अभिजीत कदम प्रशाला विद्यालयाचे प्राचार्य श्री बाबर सर ,सर्व सेवक विद्यार्थी ,पालक यांनी कलाशिक्षक श्री नरेश लोहार सर यांचे अभिनंदन केले*.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App