महाराष्ट्र

तयारी पूर्ण गगनचुंबी ताबुतांचा भेटी सोहळ्यासाठी कडेगाव सज्ज

तयारी पूर्ण गगनचुंबी ताबुतांचा भेटी सोहळ्यासाठी कडेगाव सज्ज

Download Aadvaith Global APP

 

कडेगाव : लोकभावना न्युज

  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले कडेगाव मोहरम गगनचुंबी ताबुतांची उभारणी पूर्ण झाली आहे. आज मंगळवार(दि.9) रोजी ताबुतांचा भेटी सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी 11 वा पाटील वाडा येथे पहिली भेट तर दुपारी 1 वा सुरेश बाबा देशमुख चौक-मोहरम मैदान येथे मुख्य भेटी सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान कडेगाव मोहरम निमित्त प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्व प्रकरची तयारी पूर्ण झाली आहे.कडेगाव मोहरम भेटी निमित्त पोलीस उपअधीक्षक पडमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

       कडेगाव येथील मोहरम उंच ताबुतांसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. मागील दीडशे वर्षापासून येथील मोहरमची परंपरा आजही जोपासली जात आहे. सोमवार(दि.8) रोजी पहाटेपासून पारंपारिक पद्धतीने फातेहा होवून ताबूत उभारणीला सुरुवात करण्यात आली.

      

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App