महाराष्ट्रराजकीय

कडेगाव महसुलने बळीराजाला तारले,कृषी व ग्रामविकास विभाग मात्र शांत पी एम किसान योजना कडेगाव तहसील रात्रंदिवस ऑनलाईन

कडेगाव महसुलने बळीराजाला तारले,कृषी व ग्रामविकास विभाग मात्र शांत

Download Aadvaith Global APP

 

पी एम किसान योजना कडेगाव तहसील रात्रंदिवस ऑनलाईन

 

कडेगांव/ लोकभावना न्युज

 

मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान किसान योजना देशात मोठ्या प्रमाणात राबवली आहे. वर्षातील प्रत्येक चार महिन्यात दोन हजार रुपये लाभार्थी शेतकन्यांच्या बचत खात्यात जमा होत आहेत. परंतु तांत्रिक डाटा अपुरा असल्याने काही लाभार्थ्यांना पैसे मिळताना अडचण येत होती.शासना कडुन डाटा अपलोड करण्याचे काम सुरू असून केवायसी अपूर्ण असणाऱ्या पात्र कृषी लाभार्थीनी आधार अपडेशन तातडीने करून घेणे महत्त्वाचे आहे.याची मुख्य जबाबदारी असलेल्या कृषी व ग्रामविकास विभागाने हात वर केले आहेत परंतु , कडेगाव महसूलने बळीराजाला तारले आहे.

 

 

पी एम किसान ही शासनाची योजना असून तळागाळातील गोरगरीब बळीराजाला यामुळे बहुमोल मदत होत आहे. या योजनेपासून एकही हातात शेतकरी वंचित राहू नये यासाठी कडेगाव तहसील कार्यालय करत आहे.

 

तालुक्यात 36 हजार 919 लाभार्थी लाभार्थी आहेत . ७ सप्टेंबर शेवटची तारीख असून अपूर्ण असणारी केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यावी असे आदेश शासनाने दिले आहेत यातील 22हजार859 शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे परंतु 14 हजार 60 लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केली नसल्याने त्यांना हप्ता मिळणार नाही.

             केवायसी अपूर्ण असणाऱ्या पात्र कृषी लाभार्थीनी आधार अपडेशन तातडीने करून घेणे महत्त्वाचे आहे यासाठी सर्व सेतू आणि सी एस सी सेंटर शनिवार रविवार सुरू ठेवण्याचे आदेश तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी दिले होते.

कृषी खाते, ग्रामविकास विभागाने हातवर केले, महसूलने बळीराजाला तारले अशीच भावना शेतकरी वर्ग त आहे.

 

सण विसरून महिला तलाठी ही कामात

 

तहसीलदार डॉ शैलजा पाटील , निवासी नायब तहसीलदार विलास भिसे ,सागर कुलकर्णी व सर्व कर्मचारी रात्रीचा दिवस करून काम करीत आहेत.यात महिला तलाठी आपले सन वार विसरून काम करीत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App